<font face="mangal" size="3">आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 46 डब्ल्यु खाली इलेक् - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 46 डब्ल्यु खाली इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंचाच्या प्राधिकृती करणासाठीच्या संबंधाने आरबीआयकडून प्रारुप सूचना प्रसृत
ऑक्टोबर 12, 2017 आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 46 डब्ल्यु खाली इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंचाच्या प्राधिकृती करणासाठीच्या भारतीय रिझर्व बँकेने, आज, रिझर्व बँकेकडून नियंत्रित/विनियमित केल्या जाणा-या वित्तीय बाजार संलेखांसाठीचे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंच प्राधिकृत करण्यासाठी प्रारुप सूचना/निदेश प्रसृत केले आहेत. बँका, मार्केटमधील सहभागी व इतर संबंधित पक्ष ह्यांचेकडून, ह्या प्रारुप मार्गदर्शक तत्वांवर, नोव्हेंबर 10, 2017 पर्यंत त्यांची मते/सूचना मागविण्यात येत आहेत. ह्या प्रारुप सूचनांवरील फीड बॅक पुढील पत्त्यावर पाठवावा. मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक, ह्यांना किंवा ‘फीडबॅक ऑन ड्राफ्ट डायरेक्शन्स फॉर ऑथरायझिंग ईटीपीज्’ ह्या शीर्षकाखाली ई-मेलने पाठवावा. पार्श्वभूमी जागतिक वित्तीय संकटानंतर, इलेक्ट्रॉनिक मंचावर ट्रेडिंग करण्यास, ओटीसी डेरिवेटिव मार्केट्समध्ये क्रांती करण्यासाठीचे विनियामक पुढाकार, मार्केटच्या रचनेतील बदल आणि तंत्रज्ञानातील विकास ह्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन देण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक मंचाचे अनेक फायदे आहेत, जसे, किंमती ठरविण्यातील पारदर्शकता, व्यवहारासाठी लागणारा वेळ व त्याचा खर्च ह्या स्वरुपात होणारी प्रक्रिया क्षमता, जोखीम नियंत्रणात सुधारणा, आणि मार्केटचा गैरवापर व अनुचित कार्यरीती ह्यावर देखरेख. ह्या मंचांमध्ये, मार्केट-प्रवेशाची प्रक्रिया अधिक मोठी करणे, स्पर्धा वाढविणे, पारंपरिक ट्रेडिंग कार्यरीतींवरील अवलंबन कमी करणे आणि त्याद्वारे अधिक चांगली किंमत मिळून सुधारित बाजार - तरलता प्राप्त करता येणे इत्यादी बाबींद्वारा मार्केट-रचनेवर सकारात्मक परिणाम करण्याची क्षमता आहे. वित्तीय संलेखांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंचाच्या (ईटीपी) प्राधिकृतीकरणासाठीचा एक साचा देण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्या निदेशांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. (1) पारदर्शक ट्रेडिंग, सुरक्षित अशा समायोजन प्रणाली आणि संलेखांचे प्रमाणीकरण ह्यांच्याद्वारे मार्केटचा विकास करणे. (2) उचित, न्याय्य, नीटनेटक्या व भेदभाव नसलेल्या मार्केट प्रवेशाला प्रोत्साहन देणे. (3) परिणामकारक तसेच सावध देखरेख ह्यांच्या द्वारे मार्केटचा गैरवापर टाळून वित्तीय सचोटीची खात्री करुन घेणे. (4) ट्रेडिंग संबंधीच्या माहितीच्या प्रसारणात सुधारणा करणे आणि माहिती - माहितीमधील फरक कमी करणे. ह्या संबंधीची घोषणा, ऑक्टोबर 4, 2017 च्या विकासात्मक व विनियामक धोरणे ह्यावरील निवेदनात केली गेली होती. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1017 |