<font face="mangal" size="3">आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडू - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडून, केस रायटिंग स्पर्धा, 2016 चे परिणाम घोषित
ऑगस्ट 26, 2016 आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडून, केस रायटिंग स्पर्धा, 2016 चे परिणाम घोषित भारतीय रिझर्व बँकेच्या पुणे येथील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगद्वारा, केस रायटिंग स्पर्धा 2016 चे परिणाम घोषित करण्यात आले आहेत.
ह्या महाविद्यालयाने, फेब्रुवारी 2016 मध्ये, ‘लॅडिंग टु अॅन एमएसएमई इन अॅन इन्हॉवेटिव्ह वे’ ह्या विषयावर केस रायटिंग स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा, अनुसूचित वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामिण बँका (आरआरबी), राज्य सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व अबँकीय वित्त कंपन्यांच्या कर्मचा-यांसाठी आयोजित केली होती. बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या एका मंडळाचे पुढील तीन निकषांवर मूल्यांकन केले होते. (अ) इतर बँकर्सना ह्या केस/कथेची जाणीव होण्याची क्षमता (50% गुण). (ब) उपाय/उत्तराचे नाविन्य (25% गुण). (क) सादरीकरण, भाषा व स्पष्टता (25% गुण). यशस्वी स्पर्धकांना, प्रमाणपत्रांव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे बक्षिसे दिली जातील. प्रथम क्रमांक रु.20,000/- द्वितीय क्रमांक रु. 15,000/-, तृतीय क्रमांक रु.10,000/-. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/516 |