RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78475846

आरबीआयच्या नाणेविषयक वस्तुसंग्रहालयामध्ये म्हैसूरच्या नाण्यांच्या खास प्रदर्शनाचे अनावरण

ऑगस्ट 28, 2015

आरबीआयच्या नाणेविषयक वस्तुसंग्रहालयामध्ये म्हैसूरच्या नाण्यांच्या खास प्रदर्शनाचे अनावरण

ऑगस्ट 20, 2015 रोजी, भारतीय रिझर्व बँकेच्या नाणेविषयक वस्तुसंग्रहालयात म्हैसूरच्या नाण्यांच्या खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. दीपाली पंत जोशी, कार्यकारी संचालक ह्यांनी ह्या खास प्रदर्शनाचे उदघाटन केले. ह्या प्रसंगी, म्हैसूरच्या नाण्यांच्या प्रदर्शनावरील एक 20 पानी पुस्तिकाही वितरित करण्यात आली. श्री यु एस पालीवाल, (कार्यकारी संचालक), प्रो. दामोदर आचार्य (रिझर्व बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावरील संचालक) आणि श्री. एस रामस्वामी (मुंबई कार्यालय) हे देखील उपस्थित होते.


आरबीआयच्या नाणेविषयक वस्तुसंग्रहालयामधील म्हैसूरच्या नाण्यांचे खास प्रदर्शन

ह्या प्रदर्शनात म्हैसूरच्या 112 नाण्यांचा समावेश असून (13 सोन्याची नाणी, 6 चांदीची नाणी व 93 तांब्याची नाणी). त्यामधून, तालिकोटच्या लढाईनंतरचा इ.स. 1565 पासून चार शतकांचा इतिहास उलगडला जातो. म्हैसुरचे वाडियार, हैदरअली, टिपु सुलतान ह्यांच्या अंमलाखालील नाण्यांवर हे प्रदर्शन जोर देते. म्हैसुरच्या राजांच्या अंमलाखालील सोन्याची नाणी बहुसंख्येने दिसून आली. कंठीरवा नरसरैय्या हा सोन्याची नाणी प्रसृत करणारा सर्वप्रथम राजा होता. त्या नाण्यांना कंठीरवा वराह व अर्ध वराह म्हटले जात होते व त्यांची वजने अनुक्रमे 3.5 ग्राम व 1.7 ग्राम होती. त्यावर एका बाजूवर लक्ष्मी नरसिंहाची प्रतिमा व दुस-या बाजूवर, त्याचे नाव असलेला तीन ओळींचा मजकूर होता. ह्या राजाने, सोन्याचे पानम (वजन 0.35 ग्रा.) सुरु केले. त्याच्या एका बाजूवर नरसिंह व दुस-या बाजूवर त्याचे नाव होते. तिस-या कृष्णराजाच्या राजवटीमध्ये (इ.स.1799 ते 1832) दिवाण पूर्णेयाने गिड्डा कंठीरवा पानम (गिड्डा म्हणजे जाड) पुनः सुरु केले. ही प्रथा हैदर अली व टिपु सुलतान ह्यांच्याही राजवटीत सुरु राहिली.

हे सर्व पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी, आरबीआयचे नाणे संग्रहालय, अमर बिल्डिंग (तळ मजला), सर पी. एम. रोड, मुंबई - 400 001 ला भेट द्या. वेळ - सकाळी 10.45 ते संध्याकाळी 5.15. मंगळवार ते रविवार. सोमवार व बँक सुट्टीच्या दिवशी बंद.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्रांसाठी निवेदन 2015-2016/519

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?