<font face="mangal" size="3">बँक ऑफ गियाना ह्यांचे बरोबर केलेल्या “पर्यवí - आरबीआय - Reserve Bank of India
बँक ऑफ गियाना ह्यांचे बरोबर केलेल्या “पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान” वरील
सामंजस्य करारावर (एमओयु) आरबीआयची स्वाक्षरी
एप्रिल 20, 2017 बँक ऑफ गियाना ह्यांचे बरोबर केलेल्या “पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान” वरील भारतीय रिझर्व बँकेने, बँक ऑफ गियाना बरोबर, ‘पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान’ वर केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. बँक ऑफ गियानाच्या वतीने गव्हर्नर डॉ. गोबिंद एन गंगा ह्यांनी आणि भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने, गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांनी ह्या एमओयुवर सह्या केल्या. भारतीय रिझर्व बँकेने, सहकार्य अधिकतर वाढविण्यासाठी आणि पर्यवेक्षणीय माहिती शेअर करण्यासाठी काही देशांबरोबर सामंजस्य करार, पर्यवेक्षणीय माहितीसाठीचे पत्र आणि सहकार्य-निवेदन करार केले आहेत. आतापर्यंत आरबीआयने असे 40 एमओयु, एक पर्यवेक्षणीय माहिती पत्र आणि एक सहकार्य निवेदन करारावर सह्या केल्या आहेत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2842 |