<font face="mangal" size="3">बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन एजन्सी, टर - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन एजन्सी, टर्की ह्यांच्याबरोबर, ‘पर्यवेक्षकीय सहकार व पर्यवेक्षकीय माहितीचे आदान-प्रदान’ वरील सामंजस्य करारावर (एमओयु) आरबीआयची स्वाक्षरी
डिसेंबर 21, 2016 बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन एजन्सी, टर्की ह्यांच्याबरोबर, ‘पर्यवेक्षकीय सहकार व भारतीय रिझर्व बँकेने, टर्कीच्या गणराज्याच्या, बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन एजन्सी बरोबर ‘पर्यवेक्षकीय सहकार व पर्यवेक्षकीय माहितीचे आदान-प्रदान’ ह्यावरील सामंजस्य करारावर (एमओयु) सही केली. बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन एजन्सीतर्फे, उपाध्यक्ष मि. मेहमत इर्फान कुर्ट ह्यांनी आणि भारतीय रिझर्व बँकेतर्फे श्रीमती मीना हेमचंद्र, कार्यकारी अधिकारी ह्यांनी ह्या एमओयु वर सह्या केल्या. सहकार अधिकतर वाढविण्यासाठी व पर्यवेक्षकीय माहिती शेअर करण्यासाठी, रिझर्व बँकेने, काही देशांच्या पर्यवेक्षकांबरोबर सामंजस्य करार, सुपरवायजरी को-ऑपरेशन पत्र आणि स्टेटमेंट ऑफ को-ऑपरेशन ह्यावर सह्या केल्या आहेत. ह्यामुळे आरबीआयकडून आता असे 35 एमओयु, एक लेटर ऑफ सुपरवायजरी को-ऑपरेशन आणि एक स्टेटमेंट ऑफ को-ऑपरेशनवर सह्या केल्या आहेत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1608 |