मुंबई मधील सर्व सुट्टीच्या, आरटीजीएस कार्यरत असलेल्या दिवशीही, आरबीआय रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करणार
फेब्रुवारी 17, 2016 मुंबई मधील सर्व सुट्टीच्या, आरटीजीएस कार्यरत असलेल्या दिवशीही, मार्केटमधील सहभागींना अधिक चांगले तरलता व्यवस्थापन करण्यास मदत व्हावी, आणि तरलता कार्यकृतींचा प्रदान प्रणालींशी मेळ घालण्यासाठी, रिझर्व बँकेने, मुंबईमधील सर्व सुट्टीच्या दिवशी आरटीजीएस चालु असताना, रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करण्याचे ठरविले आहे. फेब्रुवारी 19, 2016 पासून हा बदल अंमलात येईल. रिव्हर्स रेपो/एमएसएफ व्यवहारांची वेळ, अशा सुट्ट्यांच्या दिवशी संध्याकाळी 5.30 ते 7.30 असेल. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1951 |
पेज अंतिम अपडेट तारीख: