<font face="mangal" size="3">रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या ब - आरबीआय - Reserve Bank of India
रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार
मे 09, 2016 रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील व दोन्हीही अंक-फलकांमध्ये ‘R’ हे अक्षर असलेल्या रु.1000 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या बँक नोटांच्या दर्शनी बाजूवर वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, मोठे ओळख चिन्ह व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन ह्यांची सही ह्यासह इतर सर्व सुरक्षा चिन्हे असतील. ह्या नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्षही असेल. आता प्रसृत केल्या जाणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, पूर्वी दिल्या गेलेल्या व महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.1000 च्या नोटांप्रमाणेच असेल. रिझर्व बँकेने, पूर्वी दिलेल्या रु.1000 मूल्यांच्या बँक नोटा तसेच अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु ब्लीड लाईन्स व मोठे ओळख चिन्ह नसलेल्या रु.1000 च्या बँक नोटाही एक वैध चलन असणे सुरुच राहील. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2611 |