<font face="mangal" size="3">‘भारत-पाक युध्द 1965 च्या सुवर्ण जयंतीच्या’ स्मर - आरबीआय - Reserve Bank of India
‘भारत-पाक युध्द 1965 च्या सुवर्ण जयंतीच्या’ स्मरणार्थ आरबीआय रु.5 ची नाणी वितरित करणार
सप्टेंबर 3, 2015 ‘भारत-पाक युध्द 1965 च्या सुवर्ण जयंतीच्या’ स्मरणार्थ भारत पाक युध्द 1965 च्या सुवर्ण जयंतीच्या स्मरणार्थ, रिझर्व बँक, भारत सरकारने तयार केलेली रु.5 ची नाणी लवकरच प्रसारित करणार आहे. ह्या नाण्यांच्या डिझाईनमध्ये पुढील लक्षणे आहेत. दर्शनी बाजूवर - मध्यभागी अशोक स्तंभ (सिंह मुद्रा) असून त्याच्याखाली ‘सत्यमेव जयते’ कोरलेले असेल व त्याच्या डावीकडील कडेजवळ देवनागरीमध्ये ‘भारत’ व उजव्या कडेजवळ इंग्रजीत ‘INDIA’ कोरलेले असेल. अशोक स्तंभातील सिंह मुद्रेखाली रुपयाचे चिन्ह ‘’आणि आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये मूल्य 5 दिले असेल. मागील बाजूवर मध्यभागी – ‘अमर जवान’ स्मारकाच्या प्रतिमेच्या मध्यभागी आणि त्याच्या डावीकडे आणि त्याच्या उजवीकडे ऑलिव्ह वृक्षाची फांदी, आणि डावीकडील वरच्या कडेजवळ देवनागरीमध्ये ‘वीरता एवं बलिदान’ तसेच उजवीकडील वरच्या कडेजवळ इंग्रजीमध्ये ‘VALOUR AND SACRIFICE’ असेल. स्मारकाच्या प्रतिमेखाली ‘2015’ हे वर्ष असेल. वरच्या कडेजवळ, देवनागरीमध्ये ‘1965 सामरिक अभियान का स्वर्णजयंती वर्ष’ आणि नाण्याच्या ह्याच बाजूवरील खालच्या कडेजवळ ‘GOLDEN JUBILEE 1965 OPERATIONS’ लिहिले असेल. कॉईनेज अधिनियम 2011 अनुसार ही नाणी वैध चलन असतील. ह्याच मूल्याची विद्यमान नाणी ही देखील वैध चलन असणे सुरु राहतील. अल्पना किल्लावाला वृत्तपत्रांसाठी निवेदन 2015-2016/577 |