<font face="mangal" size="3">समाशोधन/समायोजनांना साह्य व्हावे ह्यासाठी ç - आरबीआय - Reserve Bank of India
समाशोधन/समायोजनांना साह्य व्हावे ह्यासाठी आरबीआय जुलै 1, 2017 रोजीही सुरु राहील
जून 29, 2017 समाशोधन/समायोजनांना साह्य व्हावे ह्यासाठी आरबीआय जुलै 1, 2017 रोजीही सुरु राहील भारतीय रिझर्व बँकेची वार्षिक लेखा समाप्ती जून 30, 2017 रोजी असल्याने (रिझर्व बँकेचे लेखा-वर्ष जुलै ते जून असते) आणि जुलै 1, 2017 हा कामकाजाचा शनिवार असल्याने, भारतीय रिझर्व बँकेने ठरविले आहे की, ती जुलै 1, 2017 रोजीही नेहमीप्रमाणे सुरु राहील व खालील सेवा उपलब्ध असतील. (1) आरटीजीएस/एनईएफटी, निधी हस्तांतरण व सिक्युरिटीजचे समायोजन ह्यासारख्या सेवा सकाळी 11.00 पासून उपलब्ध असतील. (2) टी + 0 धर्तीवर समायोजित होणा-या सर्व व्यवहारांसाठी, निधी व सिक्युरिटीजचे समायोजन सकाळी 11.00 पासून केले जाईल. (3) एलएएफ फिक्सड् रेट रेपो विंडो सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 पर्यंत कार्यान्वित असेल. फिक्सड् रेट रिव्हर्स रेपो आणि मर्जिनल स्टँडिंग सुविधा (एमएसएफ) ह्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3516 |