<font face="mangal" size="3px">आरबीआयचा तिच्या खोट्या वेबसाईटबाबत सावधान - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआयचा तिच्या खोट्या वेबसाईटबाबत सावधानतेचा इशारा
मे 26, 2014 आरबीआयचा तिच्या खोट्या वेबसाईटबाबत सावधानतेचा इशारा आज रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही अज्ञात व्यक्तींद्वारे, निरनिराळ्या बँकिंग सेवा देऊ करणारी व “आरबीआय बचत खाते” उघडण्यास ऑनलाईन अर्ज करण्यास जनतेला सांगणारी एक खोटी वेबसाईट http://www.rbi-inonline.org/savings.html येथे निर्माण करण्यात आली आहे. रिझर्व बँक येथे स्पष्ट करत आहे की, भारताची एक केंद्रीय बँक म्हणून, भारतीय रिझर्व बँक, बचत बँक खाते, चालु खाते किंवा क्रेडिट कार्ड्स ह्यासारख्या, वाणिज्य बँका देऊ करत असलेल्या सेवा देऊ करत नाही. त्यामुळे, ह्या खोट्या वेबसाईटवर निर्देशित केलेल्या ऑन लाईन सेवा, रिझर्व बँकेद्वारे दिल्या जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. रिझर्व बँकेने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे की, जनतेने, ह्या खोट्या वेबसाईट देऊ केलेल्या खोट्या ऑफर्सना बळी पडू नये. ह्याशिवाय रिझर्व बँकेने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे की, त्या वेबसाईटवर ऑन लाईन अर्ज केल्यामुळे, स्वतःची वैय्यक्तिक महत्वाची माहिती दिली जाऊन त्याचा गैरवापर केला जाऊन, जनतेचे आर्थिक व इतर प्रकारचे नुकसानच होऊ शकते. जनतेने रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईटला rbi.org.in भेट द्यावी, आणि रिझर्व बँकेच्या किंवा तिच्या गव्हर्नरांच्या आणि वरिष्ठ अधिका-यांच्या नावे पाठविलेल्या प्रचंड पैशाच्या निरनिराळ्या खोट्या ऑफर्स बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी व अशा बाबतीत काय करावे ह्यासाठी, आधी दिलेली वृत्तपत्र निवेदने पहावीत व ती मिळविण्या/पाहण्यासाठी, हेडलाईन्स स्क्रोल कराव्यात. अल्पना किल्लावाला वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2014-2015/2290
|