<font face="mangal" size="3">निरनिराळ्या प्रदान प्रणाली आवश्यकतांच्या अ - आरबीआय - Reserve Bank of India
निरनिराळ्या प्रदान प्रणाली आवश्यकतांच्या अनुपालनासाठीच्या कालरेषेत शिथिलता
आरबीआय/2021-22/41 मे 21, 2021 अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, निरनिराळ्या प्रदान प्रणाली आवश्यकतांच्या अनुपालनासाठीच्या कालरेषेत शिथिलता भारतीय रिझर्व बँकेच्या पुढील सूचनांचा संदर्भ घेतला जावा - (अ) प्रिपेड प्रदान संलेखांचे दिले जाणे व कार्यकृती ह्यावरील महानिर्देश (पीपीआय.एमडी) डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1164/02.14.006/2017-18 दि. ऑक्टोबर 11, 2017 (वेळोवेळी अद्यावत केल्यानुसार). (ब) हार्मोनायझेशन ऑफ टर्नअराऊंड टाईप (टीएटी) व प्राधिकृत प्रदान प्रणाली वापरुन अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी ग्राहक भरपाई वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.629/02.01.014/2019-20 दि. सप्टेंबर 20, 2019; (क) स्कोप अँड कव्हरेज ऑफ सिस्टिम ऑडिट ऑफ पेमेंट सिस्टिम्स वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1325/06.11.001/2019-20 दि. जानेवारी 10, 2020; (ड) गाईडलाईन्स ऑन रेग्युलेशन ऑफ पेमेंट अॅग्रिगेटर्स (पीए) अँड पेमेंट गेटवेज् (पीजी) वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1810/02.14.008/2019-20 दि. मार्च 17, 2020 आणि (ई) निरनिराळ्या प्रदान प्रणाली आवश्यकतांच्या अनुपालनासाठीच्या कालरेषेचा विस्तार वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1897/02.14.003/2019-20 दि. जून 4, 2020. (2) कोविड-19 चा पुनर् प्रादुर्भाव निरनिराळ्या बँका व अबँकीय संस्थांकडून मिळालेल्या सादरीकरणांचा विचार करुन, जोडपत्रात तपशीलवार दिलेल्या काही क्षेत्रात अनुपालनासाठी विहित केलेल्या कालरेषेचा विस्तार केला जावी असे ठरविण्यात आले आहे. (3) हे निर्देश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित कलम 10 (2) खाली देण्यात आले आहेत. आपला विश्वासु, (पी. वासुदेवन) आरबीआय परिपत्रक सीओ.डीपीएसएस.पीओएलसी.क्र.एस-106/02-14-003/2021-2022 दि. मे 21, 2021 चे जोडपत्र टेबल
|