<font face="mangal" size="3">बचत बँक खात्यातून रोख रक्कम काढण्यावरील मर् - आरबीआय - Reserve Bank of India
बचत बँक खात्यातून रोख रक्कम काढण्यावरील मर्यादा मागे
आरबीआय/2016-17/224 फेब्रुवारी 08, 2017 सर्व बँकांना महोदय/महोदया, बचत बँक खात्यातून रोख रक्कम काढण्यावरील मर्यादा मागे कृपया, वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी) 2905/10.27.00/2016-17 दि. जानेवारी 30, 2017 चा संदर्भ घ्यावा. (2) नोव्हेंबर 09, 2016 पासून विहित बँक नोटा काढून घेतल्यानंतर, भारतीय रिझर्व बँकेने, बचत/चालु/कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट खात्यांमधील आणि एटीएम्समधून रोख रक्कम काढण्यावर काही मर्यादा घातल्या होत्या. पुनर् चलनीकरणांच्या गतीचे पुनरावलोकन केल्यावर रिझर्व बँकेने, जानेवारी 31, 2017 व फेब्रुवारी 1, 2017 रोजी, अनुक्रमे, चालु/कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट खाती आणि एटीएम ह्यामधून रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध मागे घेऊन स्थिती पूर्ववत केली होती. तथापि, बचत बँक खात्यामधून रोकड काढण्यावरील मर्यादा पूर्ववतच राहिल्या होत्या. (3) पुनर् चलनीकरणाच्या गतीनुसार, असे ठरविण्यात आले आहे की, बचत बँक खात्यावरील (पीएमजेडीवाय खाली उघडलेल्या खात्यांसह) रोकड काढण्यावरील निर्बंध पुढील दोन पाय-यांच्या प्रक्रियांमधून मागे घेण्यात यावेत. (1) फेब्रुवारी 20, 2017 पासून, बचत बँक खात्यामधून रोकड काढण्यावरील मर्यादा, रु.50,000 प्रति सप्ताह (विद्यमान रु. 24,000 प्रतिसप्ताह ऐवजी) वाढविण्यात आली आहे आणि (2) मार्च 13, 2017 पासून बचत बँक खात्यामधून काढावयाच्या रोख रकमेवर कोणतीही मर्यादा नसेल. (4) कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु (पी विजया कुमार) |