<font face="mangal" size="3px">विद्यमान रु.500/- व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक&# - आरबीआय - Reserve Bank of India
विद्यमान रु.500/- व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - अहवाल व देखरेख - काऊंटर्सवर/एटीएम मधून बँक नोटा देण्याबाबत माहिती
आरबीआय/2016-17/128 नोव्हेंबर 12, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/ महोदय, विद्यमान रु.500/- व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - अहवाल व देखरेख - काऊंटर्सवर/एटीएम मधून बँक नोटा देण्याबाबत माहिती कृपया, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण बाद करणे - अहवाल व देखरेख वरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1264/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 11, 2016 चा संदर्भ घ्यावा. (2) ह्याच संदर्भात ठरविण्यात आले आहे की, काऊंटर्सवरुन काढलेल्या तसेच एटीएम मधून काढलेल्या रोख रकमेचा तपशील दैनिक धर्तीवर बँकांनी देणे आवश्यक आहे. त्यानुसार, सुधारित केलेले जोडपत्र 6अ सोबत जोडले आहे. आमच्या येथे माहिती एकत्रित करण्यात मदत व्हावी ह्यासाठी आपणास विनंती करण्यात येते की, नोव्हेंबर 13, 2016 पासून, जोडपत्र 6 अ च्या व्यतिरिक्त, सोबतच्या एक्सेल फाईल मध्ये माहिती देण्यात यावी. कृपया नोंद घ्यावी की, दैनिक अहवाल मेलने पाठवावेत. आपली विश्वासु, (पी विजया कुमार) सोबत : वरील प्रमाणे रु.500/- व रु.1000/- मूल्याच्या एसबीएनची दैनिक प्राप्ती आणि खात्यांमधून काढलेली रोख रक्कम (काऊंटर्सवरुन व एटीएममधून), आरबीआय, डीसीएम, केंद्रीय कार्यालय ह्यांना ईमेल द्वारा कळविण्याचा नमुना बँकेचे नाव : व्यवहारांची तारीख : मिळालेल्या एसबीएन/दिलेल्या बँक नोटांचा तपशील :
|