<font face="mangal" size="3px">बिटकॉईन्सह आभासी चलनांच्या धोक्यांबाबत रिé - आरबीआय - Reserve Bank of India
बिटकॉईन्सह आभासी चलनांच्या धोक्यांबाबत रिझर्व बँकेचा सावधानतेचा इशारा
डिसेंबर 5, 2017 बिटकॉईन्सह आभासी चलनांच्या धोक्यांबाबत रिझर्व बँकेचा सावधानतेचा इशारा भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) डिसेंबर 24, 2013 रोजी दिलेल्या वृत्तपत्र निवेदनाकडे जनतेचे लक्ष वेधण्यात येत आहे. त्यात आरबीआयने, बिटकॉईन्सह आभासी चलने (व्हीसी) वापरणारे, बाळगणारे व त्यात व्यापार करणारे ह्यांना, अशी व्हीसी हाताळण्याबाबत, संभाव्य अशा आर्थिक, वित्तीय, कार्यकारी, कायदेशीर, ग्राहक संरक्षण व सुरक्षा ह्यांच्याशी संबंधित धोक्यांबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. फेब्रुवारी 1, 2017 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनाद्वारे आरबीआयने स्पष्ट केले आहे की, अशा योजना चालविण्यासाठी किंवा बिटकॉईन किंवा अन्य व्हीसीमध्ये व्यवहार करण्यासाठी, आरबीआयने कोणत्याही संस्थेला/कंपनीला कोणताही परवाना/प्राधिकरण दिलेले नाही. अनेक व्हीसींच्या मूल्यांकनामधील झालेली लक्षणीय वाढ व सुरुवातीच्या कॉईन ऑफरिंग (सीओ) मध्ये झालेली जलद वाढ लक्षात घेऊन, ह्यापूर्वी देण्यात आलेल्या वृत्तपत्र निवेदनात व्यक्त केलेली काळजी, आरबीआय पुनश्च व्यक्त करत आहे. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1530 |