RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78521072

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांच्या ठेवीदारांसाठी, रिझर्व्ह बँकेकडून निकासी मर्यादेत रु.25,000/- पर्यंत वाढ

ऑक्टोबर 3, 2019

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांच्या ठेवीदारांसाठी, रिझर्व्ह बँकेकडून निकासी मर्यादेत रु.25,000/- पर्यंत वाढ

येथे स्मरण व्हावे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. च्या ठेवीदारांना, त्यांच्या खात्यांमधील एकूण शिल्लकेमधून रु.10,000/- (दहा हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती.

वरील बँकेची तरलता-स्थिती व तिच्या ठेवीदारांना प्रदान करण्याची क्षमता ह्यांचा आढावा घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेच्या तरलता स्थितीचा पुनश्च आढावा घेतला असून आता निकासीची मर्यादा रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार) करण्याचे ठरविले आहे.

वरील शिथिलतेमुळे, वरील बँकेचे सुमारे 70% ठेवीदार त्यांच्या खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम काढू शकतील. रिझर्व्ह बँक ह्यावर जवळून देखरेख करत असून, वरील बँकेच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांसाठी आवश्यक ती पाऊले उचलत राहील.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 36 अअअ (5)(अ) अनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने, प्रशासक, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांना मदत करण्यासाठी, तीन सदस्यांची एक समिती नेमण्याचेही ठरविले आहे.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/861

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?