<font face="mangal" size="3">पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. च्या ठ&# - आरबीआय - Reserve Bank of India
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. च्या ठेवीदारांच्या निकासी मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून रु.50,000/- पर्यंत वाढ
नोव्हेंबर 5, 2019 पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. च्या ठेवीदारांच्या निकासी मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून रु.50,000/- पर्यंत वाढ येथे स्मरण व्हावे की भारतीय रिझर्व्ह बँकेने, ऑक्टोबर 14, 2019 रोजी, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. (पीएमसी) च्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यांतील एकूण शिल्लक रकमेमधून रु.40,000/- (रुपये चाळीस हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती. वरील बँकेची तरलता स्थिती व ठेवीदारांना प्रदान करण्याची क्षमता ह्यांचा आढावा घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरविले आहे की, ही निकासी मर्यादा, पूर्वी परवानगी दिलेल्या रु.40,000/- सह आता रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) पर्यंत वाढविली जावी. वरील शिथिलतेमुळे, वरील बँकेचे 78% पेक्षा अधिक ठेवीदार आपल्या खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम काढू शकतील. वरील बँकेच्या स्वतःच्या एटीएम मधूनही रु.50,000/- ह्या विहित मर्यादेतील रक्कम काढण्यास ठेवीदारांना परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्यामुळे निकासी प्रक्रियेवरील ताण कमी होईल. रिझर्व्ह बँक स्थितीवर जवळून देखरेख करत असून, वरील बँकेच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यास आवश्यक ती पाऊले उचलणे सुरुच ठेवील. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन : 2019-2020/1110 |