<font face="Mangal" size="3">भारतीय रिझर्व बँकेकडून अॅक्सिस बँक लि. ह्यां - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व बँकेकडून अॅक्सिस बँक लि. ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
फेब्रुवारी 5, 2019 भारतीय रिझर्व बँकेकडून अॅक्सिस बँक लि. ह्यांचेवर आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने, जानेवारी 29, 2019 रोजी, अॅक्सिस बँक लि. (बँक) ह्यांचेवर रु.2 दशलक्ष (रुपये दोन दशलक्ष) आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेने जुलै 20, 2017 रोजीचे, नकली नोटा शोधणे व जप्त करणे ह्यावरील महापरिपत्रक आणि नोव्हेंबर 19, 2018 रोजीचे, नोटांचे सॉर्टिंग करणे - नोट सॉर्टिंग यंत्रे स्थापन करणे ह्यावरील परिपत्रक ह्यामध्ये दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले गेल्याने लागु करण्यात आला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) च्या तरतुदीखाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी संबंधित नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1857 |