<font face="mangal" size="3">बँक ऑफ महाराष्ट्र ह्यांचेवर भारतीय रिझर्व ब - आरबीआय - Reserve Bank of India
बँक ऑफ महाराष्ट्र ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु
जानेवारी 16, 2019 बँक ऑफ महाराष्ट्र ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) आदेश दि. जानेवारी 4, 2019 अन्वये, बँक ऑफ महाराष्ट्र (ती बँक) ह्यांचेवर रु.10.00 दशलक्ष दंड लागु केला असून, तो दंड, जुलै 1, 2016 रोजीचे, फसवणुकी वर्गीकरण न कळविणे ह्यावरील आरबीआयचे महानिर्देश आणि फेब्रुवारी 25, 2016 रोजीचे (जुलै 8, 2016 रोजी अद्यावत केलेले), तुमचा ग्राहक जाणावर आरबीआयने दिलेले महानिर्देश ह्यांचे अनुपालन न केले गेल्याने लागु करण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे त्या बँकेकडून अनुपालन न केले गेल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड जारी करण्यात आला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित असून, त्या बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या करारांशी किंवा व्यवहारांशी संबंधित नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1670 |