<font face="mangal" size="3">आयडीबीआय बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँक - आरबीआय - Reserve Bank of India
78503161
प्रकाशित तारीख
एप्रिल 11, 2018
आयडीबीआय बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु
एप्रिल 11, 2018 आयडीबीआय बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँकेने, एप्रिल 9, 2018 रोजीच्या आदेशान्वये, आयडीबीआय बँक लि. (ती बँक) ह्यांना, आरबीआयने दिलेल्या उत्पन्न ओळख व वर्गीकरण (आयआरएसी) वरील नॉर्म्सचे अनुपालन न केले गेले असल्याने, रु.30 दशलक्ष दंड लावला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे पालन न केले गेल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने लागु केला आहे. विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर ही कारवाई आधारित असून, तिचा संबंध, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा कराराच्या वैधतेशी नाही. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2706 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?