<font face="mangal" size="3">आयडीएफसी बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिè - आरबीआय - Reserve Bank of India
आयडीएफसी बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 24, 2017 आयडीएफसी बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु ऑक्टोबर 23, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, आयडीएफसी बँक लि. (बँक) ह्यांना, कर्जे व अग्रिम राशींवरील विनियामक निर्बधांचे उल्लंधन केल्याबाबत रु.20 दशलक्ष दंड लागु केला आहे. आरबीआयने दिलेल्या काही निदेशांचे वरील बँकेने पालन न केल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित कलम 47अ(1)(क) ने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे. विनियामक बाबींचे अनुपालन न केल्यानेच ही कारवाई करण्यात आली असून, त्याचा संबंध ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करारांच्या वैधतेशी नाही. पार्श्वभूमी वरील बँकेच्या वित्तीय स्थितीवरील दर्जा-अहवालामध्ये, इतर बाबींबरोबर, कर्जे व अग्रिम राशींचे नूतनीकरण/मंजुरी संबंधाने असलेल्या काही निदेशांचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. ह्या दर्जा - अहवालावर आधारित, आरबीआयने दिलेल्या निदेशांचे अनुपालन न केल्याने, दंड का लावण्यात येऊ नये ह्याबाबत एक कारणे दाखवा नोटिस वरील बँकेला ऑगस्ट 7, 2017 रोजी पाठविण्यात आली होती. ह्यावर वरील बँकेने दिलेले लेखी उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीतील मौखिक सादरीकरण विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, आरबीआयने दिलेल्या निदेशांचे पालन न करणे हे प्रत्यक्षात घडले असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1117 |