<font face="mangal" size="3px">इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांचेव&# - आरबीआय - Reserve Bank of India
इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 9, 2018 इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व बँकेने, आदेश दि. सप्टेंबर 26, 2018 अन्वये, इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांचेवर रु.20 लक्ष दंड लागु केला असून तो दंड, त्या बँकेने तिला दिलेल्या सर्वसमावेशक निर्देशांचे (एआयडी) केलेले उल्लंघन, फसवणुकींचे वर्गीकरण व कळविणे ह्यावरील आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन न करणे ह्यासाठी लावण्यात आला आहे. वर दिलेले निर्देश व आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे, वरील बँकेने अनुपालन न केल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(i) सह वाचित, कलम 47अ(1)(क) आणि कलम 56 खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे. ही कारवाई विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून तिचा संबंध वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/832 |