<font face="mangal" size="3">साऊथ इंडियन बँक लि. ह्यांचेवर रिझर्व्ह बँकेक - आरबीआय - Reserve Bank of India
साऊथ इंडियन बँक लि. ह्यांचेवर रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
जून 19, 2019 साऊथ इंडियन बँक लि. ह्यांचेवर रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व्ह बँकेने आदेश दि. जून 13, 2019 अन्वये, साऊथ इंडियन बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.1 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, ‘गॅरंटीज व को-अॅक्सेप्टन्स’वर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केले गेले असल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन वरील बँकेने न केल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(आय) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी संबंधित नाही. पार्श्वभूमी आवाहित करण्यात आलेल्या बँक-गॅरंटीचे वरील बँकेने प्रदान न केल्याबाबतचे संदर्भ, एका सरकारी विभागाकडून आणि एका खाजगी पक्षाकडून आरबीआयला प्राप्त झाले होते. ह्याबाबत केलेल्या तपासणीत, वरील बँकेने, ‘गॅरंटीज व को-अॅक्सेप्टन्स’वर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केल्याचे आढळून आले आणि वरील सूचनांचे अनुपालन न केल्या कारणाने, तिला दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे दाखविण्याबाबत एक नोटिसही वरील बँकेला देण्यात आली होती. वरील बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणी दरम्यन दिलेली तोंडी सदरीकरणे आणि वैय्यक्तिक सुनवणीनंतर वरील बँकेने दिलेली अतिरिक्त सादरीकरणे विचारात घेतल्यानंतर आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन केले नसल्याचा वरील दावा सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2990 |