भारतीय रिझर्व बँकेकडून भारतीय स्टेट बँकेवर आर्थिक दंड लागु
मार्च 7, 2018 भारतीय रिझर्व बँकेकडून भारतीय स्टेट बँकेवर आर्थिक दंड लागु मार्च 1, 2018 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, भारतीय स्टेट बँकेवर, खोट्या नोटा ओळखणे व जप्त करणे ह्यावरील आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबाबत रु. 4 दशलक्ष दंड लागु केला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे. वरील कारवाई वरील बँकेच्या विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, ती वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार व करार ह्यांच्याशी संबंधित नाही. पार्श्वभूमी वरील बँकेच्या दोन शाखांच्या धन कोषांच्या तपासणी दरम्यान, इतर बाबींबरोबर, खोट्या नोटा ओळखणे व जप्त करणे ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. तपासणी अहवाल व इतर संबंधित कागदपत्रांच्या आधारावर, जानेवारी 5, 2018 रोजी वरील बँकेला एक नोटिस पाठविण्यात आली व आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल, त्या बँकेला दंड का करण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगितले होते. त्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर आणि वैय्यक्तिक सुनावणीमधील मौखिक सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे पालन न केल्याबाबतचे वरील आरोप सत्य असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2385 |
पेज अंतिम अपडेट तारीख: