RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78518355

भारतीय रिझर्व बँकेकडून सिंडिकेट बँक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

फेब्रुवारी 5, 2019

भारतीय रिझर्व बँकेकडून सिंडिकेट बँक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

आदेश दि. जानेवारी 30, 2019 अन्वये, भारतीय रिझर्व बँकेने, सिंडिकेट बँक (ती बँक) ह्यांचेवर रु.10 दशलक्ष (दहा दशलक्ष) आर्थिक दंड लागु केला असून हा दंड आरबीआयचे जुलै 1, 2015 रोजीचे, फसवणुकी - वर्गीकरण व फसविणे ह्यावरील महापरिपत्रक आणि आरबीआयने दिलेले, ऑक्टोबर 7, 1999 रोजीचे, बँकांमधील जोखीम व्यवस्थापन ह्यावरील परिपत्रक ह्यामध्ये दिलेल्या निर्देशांचे अनुपालन वरील बँकेने केले नसल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे पालन न केले असल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या, कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन तिने हा दंड लागु करण्यात आला आहे.

ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर तिने केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी संबंधित नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1854

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?