RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

128884779

भारतीय रिझर्व बँकेने द अंजनगाव सुर्जी नागरी सहकारी बँक लिमिटेड, अंजनगाव सुर्जी, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 8 फेब्रुवारी 2024, रोजीच्या आदेशाद्वारे अंजनगाव सुर्जी नागरी सहकारी  बँक लिमिटेड, अंजनगाव सुर्जी, महाराष्ट्र (बँक) वर, बँकिंग नियमन कायदा 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 35(A)(1) आणि 36(1) अंतर्गत जारी केलेले निर्देश विशिष्ट निर्देशांचे पालन केल्याबद्दल 0.50 लाख (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि  कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(C) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  हा दंड ठोठावण्यात आला आहे.

हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी  केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्तिथीवर आधारित बँकेच्या वैधानिक तपासणी आणि जोखीम मुल्यांकन अहवालाचे परीक्षण आणि या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले कि बँकेने, i) भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 35A(1) अन्वये जारी केलेल्या निर्देशानुसार, आपल्या खातेदारांना विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी दिली आणि ii) सुपरवायझरी एक्शन फ्रेमवर्क अंतर्गत विशेष निर्देश जारी केल्यानंतरही त्याचे उल्लंघन करीत नवीन कर्ज मंजूर केले. परिणामी, बँकेला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, ज्यात म्हटल्याप्रमाणे , वरील निर्देशांचे पालन करण्या अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर वैयक्ति सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन त्यानंतर केलेले अतिरिक्त निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल)  
मुख्य महा प्रबंधक

प्रेस प्रकाशनी2023-2024/1867  

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?