<font face="mangal" size="3">दि गोवा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., पणजी (गोवा) ह्यì - आरबीआय - Reserve Bank of India
दि गोवा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., पणजी (गोवा) ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
सप्टेंबर 13, 2019 दि गोवा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., पणजी (गोवा) ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु सप्टेंबर 11, 2019 रोजीच्या एका आदेशान्वये, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दि गोवा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., पणजी (गोवा) (ती बँक) ह्यांचेवर रु.5 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) वर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केले गेल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 46 (4)(आय) व 56 सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही. पार्श्वभूमी मार्च 31, 2018 रोजी असलेल्या वरील बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात केलेल्या वैधानिक तपासणीत, इतर बाबींबरोबर, वरील बँकेने, एसएएफ व ठेवी खाती/लेखा ठेवणे ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याचे आढळून आले. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न करण्याबद्दल तिला आर्थिक दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्याबाबत एक नोटिस वरील बँकेला देण्यात आली. ह्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीमधील तोंडी सादरीकरणे व वैय्यक्तिक सुनावणीनंतर केलेली अतिरिक्त सादरीकरणे विचारात घेऊन, आरबीआयने निष्कर्ष काढला की, (एसएएफ) आरबीआयच्या सूचनांचे अनुपालन न केल्याचा वरील दावा सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/698 |