RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78515102

दि मेहमदाबाद अर्बन पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., मेहमदाबाद ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु

सप्टेंबर 13, 2019

दि मेहमदाबाद अर्बन पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., मेहमदाबाद ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु

जुलै 25, 2019 रोजीच्या एका आदेशान्वये, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दि मेहमदाबाद अर्बन पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., मेहमदाबाद (ती बँक) ह्यांचेवर रु.2 लाख (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून, तो दंड, संचालकांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशी आणि केवायसी नॉर्म्स/एएमएल मानके ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे.

आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केले गेल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 46 (4)(आय) व 56 सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.

ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही.

पार्श्वभूमी

मिळालेल्या तक्रारींच्या आधारावर आरबीआयकडून वरील बँकेची पुस्तके व लेखा/खाती ह्यांची तपासणी केली असता दिसून आले की, इतर बाबींबरोबर, वरील बँकेने, संचालकांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशी आणि केवायसी नॉर्म्स/एएमएल मानकांवर दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केल्याबद्दल, त्या बँकेला दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्याबाबत एक नोटिस वरील बँकेला देण्यात आली.

ह्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीमधील तोंडी सादरीकरणे व वैय्यक्तिक सुनावणीनंतर केलेली अतिरिक्त सादरीकरणे विचारात घेऊन, आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयच्या सूचनांचे अनुपालन न केल्याचा वरील दावा सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/699

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?