<font face="mangal" size="3">टोयोटा फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लि. ह्ë - आरबीआय - Reserve Bank of India
टोयोटा फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 10, 2019 टोयोटा फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आदेश दि. ऑक्टोबर 9, 2019 अन्वये मे. टोयोटा फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लि. (ती कंपनी) ह्यांचेवर रु.5 लाख दंड लागु केला असून, तो दंड, “एनबीएफसींमधील फसवणुकींवर देखरेख” वरील आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. हा दंड, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 (हा आरबीआय अधिनियम) च्या कलम 58 ब च्या पोटकलम (5) च्या खंड (अ अ) सह वाचित, कलम 58 जी च्या पोटकलम (1) च्या खंड (ब) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन लावण्यात आला आहे. ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही. पार्श्वभूमी जुलै-ऑगस्ट 2018 दरम्यान, आरबीआय अधिनियमाच्या कलम 45 एन खाली वरील कंपनीची तपासणी करण्यात आली. ह्या तपासणीदरम्यान दिसून आले की, इतर बाबींसह, वरील कंपनीने, एनबीएफसींमधील फसवणुकींवर देखरेख करण्याबाबत आरबीआयने दिलेल्या निरनिराळ्या सूचनांचे पालन केलेले नाही. ह्यासाठी वरील कंपनीला एक नोटिस पाठवून, वरील सूचनांचे पालन तिने न केल्याबद्दल तिला दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यास तिला सांगण्यात आले होते. वरील प्रकरणातील संपूर्ण सत्य, त्या कंपनीने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीत केलेली सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, तपासणीदरम्यान आढळून आलेली उल्लंघने सिध्द होत असून व त्यासाठी त्या कंपनीला आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. त्यानुसार वरील कंपनीला रु.5 लाख दंड लावण्यात आला. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन : 2019-2020/910 |