<font face="Mangal" size="3">युको बँक ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आë - आरबीआय - Reserve Bank of India
युको बँक ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु
फेब्रुवारी 5, 2019 युको बँक ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु जानेवारी 29, 2019 रोजीच्या आदेशान्वये, भारतीय रिझर्व बँकेने, युको बँक लि.(बँक) ह्यांना रु.20 दशलक्ष (रुपये वीस दशलक्ष) आर्थिक दंड लागु केला असून हा दंड, वरील बँकेने, ‘अकाऊंट पेयी चेक्सने संकलन - ते उत्पन्न तृतीय पक्षाच्या खात्यात जमा करण्यावरील मनाई’ वरील आरबीआयचे जानेवारी 22, 2014 चे परिपत्रक, आणि ‘फसवणुकी - वर्गीकरण व वाणिज्य बँका व निवडक एफआयएस कडून कळविले जाणे’ ह्यावरील आरबीआयचे महानिर्देश दि. जुलै 1, 2016 ह्यांचे अनुपालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे पालन न केले असल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या, कलम 46(4)(i) सह वाचित, कलम 47अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन तिने हा दंड लागु करण्यात आला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर तिने केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी संबंधित नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1856 |