<font face="mangal" size="3px">भारतीय रिझर्व्ह बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडि - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडिया ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
जुलै 15, 2019 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडिया ह्यांचेवर आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व्ह बँकेने(आरबीआय), जुलै 9, 2019 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया (ती बँक) ह्यांचेवर रु. एक दशलक्ष दंड लागु केला असून तो दंड, बँकांमधील सायबर सुरक्षा साचा ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन त्या बँकेने न केल्याबद्दल लावण्यात आला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4) (आय) व कलम 51 (1) सह वाचित कलम 47 अ (1) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे. ही कारवाई विनियात्मक त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करारांच्या वैधतेशी संबंधित नाही. पार्श्वभूमी 2016 मध्ये ह्या बँकेच्या स्विफ्ट प्रणालीमधून एकूण 171 दशलक्ष युएसडी मूल्याचे सात खोटे/बनावट संदेश निर्माण झाले असल्याच्या अहवालांच्या आधारावर, वरील बँकेच्या सायबर सुरक्षा साचाची तपासणी करण्यात आली व त्यातून अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. ह्या माहितीवर आधारित, विद्यमान सूचनांचे अनुपालन न केले गेले असल्याबद्दल दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्याबाबत वरील बँकेला नोटिस पाठविण्यात आली होती. वरील बँकेने दिलेली उत्तरे व वैय्यक्तिक सुनावणीत केलेली सादरीकरणे विचारात घेऊन वरील बँकेने अनुपालन न केल्याचे प्रमाण/व्याप्ती व तिने केलेली सुधारात्मक कारवाई ह्यावर आधारित, आरबीआयने वरील आर्थिक दंड लागु करण्याचे ठरविले. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/153 |