RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78511504

येस बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 24, 2017

येस बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 23, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), येस बँक लि. ह्यांना, इनकम रेकग्निशन अॅसेट क्लासिफिकेशन (आयआरएसी) नॉर्म्स ह्यावरील आरबीआयने दिलेल्या निदेशांचे अनुपालन न करणे, आणि वरील बँकेच्या एटीएम्सबाबत, सिक्युरिटी इन्सिडेटाची माहिती उशिरा कळविणे ह्यासाठी, रु.60 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला आहे. आरबीआयने दिलेल्या काही निदेशांचे अनुपालन न केल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित कलम 47अ(1)(सी) ने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे.

विनियामक बाबींचे अनुपालन न केल्यानेच ही कारवाई करण्यात आली असून, त्याचा संबंध ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करारांच्या वैधतेशी नाही.

पार्श्वभूमी

मार्च 31, 2016 रोजीच्या वित्तीय स्थिती संबंधाने वरील बँकेच्या वैधानिक तपासणीमध्ये, इतर बाबींबरोबर, अकार्यकारी अॅसेट्स (एनपीएएस) च्या मूल्यमापनाबाबत, आरबीआयने दिलेल्या निरनिराळ्या विनियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. एटीएमबाबतचा एक सायबर-सुरक्षा-प्रसंगही, विहित केलेल्या कालावधीत आला नव्हता. ह्या तपासणी अहवालावर व इतर संबंधित कागदपत्रांवर आधारित जुलै 6, 2017 रोजी व त्यानंतर ऑगस्ट 24, 2017 रोजी, आरबीआयने दिलेल्या निदेशांचे पालन न केल्या कारणाने आर्थिक दंड का लावला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटिस वरील बँकेला पाठविण्यात आली होती. ह्यावर वरील बँकेने दिलेली उत्तरे व वैय्यक्तिक सुनावणीमध्ये केलेले मौखिक सादरीकरण तसेच सादर केलेली अतिरिक्त माहिती व कागदपत्र विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयने दिलेल्या निदेशांचे अनुपालन न केल्याबाबतचे दावे खरे असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1116

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?