<font face="mangal" size="3">द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - 2.0 – सुक् - आरबीआय - Reserve Bank of India
द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - 2.0 – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कोविड-19 संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण – एकुण एक्सपोझर साठीच्या मर्यादेत सुधारणा
आरबीआय/2021-22/47 दि. जून 4, 2021 सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकां सह) महोदय/महोदया, द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - 2.0 – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कोविड-19 “द्रवीकरण साचा - 2.0 – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कोविड-19 संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण” परिपत्रक डीओआर.एसटीआर.आरईसी.12/21.04.048/2021-22 दि. मे 5, 2021 चा संदर्भ घेण्यात यावा. 2. वरील परिपत्रकातील खंड 2 मध्ये, ह्या साचाखाली पुनररचनेसाठी विचारात घ्यावयाच्या पात्रता अटी विहित केल्या असून त्यात पोटखंड 3 समाविष्ट करण्यात आला आहे. व त्या पोटखंडानुसार, एमएसएमई कर्जदारांना, सर्व कर्जदायी संस्थांनी दिलेल्या निधीयुक्त नसलेल्या सुविधांसहचे एकुण एक्सपोझर, मार्च 31, 2021 रोजी रु. 25 कोटींपेक्षा अधिक असू नये. 3. पुनरावलोकनावर आधारित ठरविण्यात आले आहे की, वरील मर्यादा रु. 25 कोटींपासून रु. 50 कोटींपर्यंत वाढविण्यात यावी 4. त्यानुसार, खंड 2(5) पुढिल प्रमाणे सुधारित करण्यात आला आहे.
5. ह्या परिपत्रकातील इतर तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु, (मनोरंजन मिश्रा) |