<font face="mangal" size="3">कोविड-19 संबंधित ताण-तणावासाठी द्रवीकरण साचा (र& - आरबीआय - Reserve Bank of India
कोविड-19 संबंधित ताण-तणावासाठी द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - वित्तीय पॅरामीटर्स
आरबीआय/2020-21/34 सप्टेंबर 7, 2020 सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश) महोदय/महोदया, कोविड-19 संबंधित ताण-तणावासाठी द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - वित्तीय पॅरामीटर्स कृपया परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी/3/21.04.048/2020-21 दि. ऑगस्ट 6, 2020 (‘द्रवीकरण साचा’) च्या जोडपत्रातील परिच्छेद 23 व 24 चा संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, रिझर्व बँकेने, आवश्यक असलेल्या वित्तीय पॅरामीटर्सवर शिफारशी करण्यासाठी (एक तज्ञ समिती करावी आणि ह्या द्रवीकरण साचाच्या जोडपत्राच्या विभाग ब खाली पात्र असलेल्या कर्जदारांबाबतच्या द्रवीकरण योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी अशा पॅरामीटर्ससाठी विशिष्ट बेंचमार्क व्याप्ती (रेंजेस) ठेवाव्यात. (2) त्यानुसार ऑगस्ट 7, 2020 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, रिझर्व बँकेने श्री. के.व्ही. कामत ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समितीची स्थापना केली. ह्या तज्ञ समितीने, सप्टेंबर 4, 2020 रोजी तिच्या शिफारशी रिझर्व बँकेकडे सादर केल्या व रिझर्व बँकेने त्या स्थूल मानाने/बहुतांश स्वीकारल्या. (3) त्यानुसार, सर्व कर्ज देणा-या संस्था ह्या द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील विभाग ब खाली, पात्र असलेल्या कर्जदारांच्या बाबतीत, द्रवीकरण योजना अंतिम/निश्चित करतेवेळी पुढील महत्त्वाच्या गुणोत्तरे (की रेशोज्) अपरिहार्यतेने विचारात घेतील.
(4) एखाद्या पात्र असलेल्या कर्जदाराबाबतच्या द्रवीकरण गृहीतकामध्ये, कर्जदायी संस्थांनी विचारात घेणे आवश्यक असलेल्या वरील प्रत्येक महत्त्वाच्या गुणोत्तरासाठीचे क्षेत्र - विशिष्ट मर्यादा (असेल त्यानुसार मर्यादा, स्तर) जोडपत्रात दिलेल्या आहेत. जेथे क्षेत्र विशिष्ट मर्यादा विहित केलेल्या नाहीत अशा क्षेत्रांच्या बाबतीत, कर्जदायी संस्था टीओएल/एटीएनडब्ल्यु व एकूण कर्ज/ईबीआयटीडीए बाबत त्यांचे स्वतःचे अंतर्गत मूल्यमापन करतील. तथापि, सर्व प्रकरणांमधील विद्यमान गुणोत्तर व डीएससीआर 1.0 व त्यापेक्षा अधिक असेल व एडीएससीआर 1.2 व त्यापेक्षा अधिक असेल. (5) विहित केलेल्या वरील अपरिहार्य की रेशोज् व क्षेत्र विशिष्ट मर्यादांव्यतिरिक्त, पात्र असलेल्या कर्जदारांच्या बाबतीत द्रवीकरण गृहीतके निश्चित/अंतिम करतेवेळी, कर्जदायी संस्थांना इतर वित्तीय पॅरामीटर्स विचारात घेण्याचे स्वातंत्र्य आहे. केवळ एकाच कर्जदाराचे एक्सपोझर असलेली केवळ एकच कर्जदायी संस्था असल्यासही वरील आवश्यकता तिला लागु असतील. (6) परिच्छेद 4 मध्ये विहित केलेली गुणोत्तरे ही मर्यादा किंवा स्तर म्हणून समजण्यासाठी आहेत (असेल त्यानुसार) परंतु द्रवीकरणाच्या योजना करतेवेळी, प्रत्येक प्रकरणातील सुयोग्य गुणोत्तरे ठरविताना त्यानंतरच्या वर्षांमधील कॅशफ्लोज्चे मूल्यमापन करण्यासाठी, द्रवीकरण योजना अंतिम करतेवेळी, त्या कर्जदाराने कोविड-19 पूर्व चालविलेले खाते व त्याची कामगिरी व कोविड-19 मुळे त्या खाते चालकावर वित्तीय कामगिरीवर झालेला परिणाम विचारात घेतला जाईल. (7) ह्या देशव्यापी साथीचा निरनिराळ्या क्षेत्रांवर/संस्थांवर झालेला अलग-अलग आघात/प्रभाव ज्ञात झाल्यावर, कर्जदायी संस्था त्यांना तसे वाटल्यास, द्रवीकरण योजना तयार करतेवेळी व तिची अंमलबजावणी करतेवेळी त्या कर्जदारांवर झालेल्या आघाताच्या गंभीरपणावर आधारित दर्जात्मक दृष्टिकोन स्वीकारु शकतात. अशा गंभीरपणाच्या दर्जात्मक दृष्टिकोनामध्ये त्या कर्जदारावर झालेल्या आघातांचे सौम्य, मध्यम व गंभीर असे वर्गीकरण, वरील समितीने केलेल्या शिफारशीनुसार केले जाऊ शकते. (8) कर्जदायी संस्थांनी, द्रवीकरण योजनेनुसार, ती अंमलात आणतेवेळीच, टीओएल/एटीएनडब्ल्युंचे अनुपालन केले असल्याची खात्री करुन घेणे अपेक्षित आहे. तथापि, सर्वच प्रकरणांमध्ये, द्रवीकरण योजनेनुसार हे गुणोत्तर मार्च 31, 2022 पर्यंत व त्यानंतरही सातत्याने ठेवणे आवश्यक आहे. तथापि, जेथे द्रवीकरण योजनेत इक्विटी इनफ्युजन असण्याची शक्यता आहे तेथे, हे गुणोत्तर ह्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ठेवले जावे. इतर सर्व ‘की रेशोज’ मार्च 31, 2022 पर्यंत व त्यानंतर सातत्याने द्रवीकरण योजनेनुसार ठेवली जावीत. (9) संमत गुणोत्तरे ठेवण्याबाबतच्या अनुपालनावर वित्तीय म्हणून, सातत्याने व त्यानंतरच्या कर्ज-आढाव्यांमध्ये देखरेख ठेवली जावी. ह्याबाबत केलेला भंग, कर्ज कराराच्या अटीनुसार वाजवी कालावधीत दुरुस्त न केला गेल्यास ती वित्तीय अडचण समजली जाईल. इतर स्पष्टीकरणे - आयसीए व एसक्रो खाते लागु असणे (10) द्रवीकरण योजनेच्या निरनिराळ्या आवश्यकता, विशेषतः लागु असेल तेथे आयसीएची आवश्यकता आणि द्रवीकरण योजनेच्या अंमलबजावणीनंतर एक एक एसक्रो खाते ठेवणे हे कर्जदार - खात्याच्या स्तरावर लागु असेल -म्हणजे, कर्जदायी संस्थांना ज्यांच्याबाबत एक्सपोझर आहे अशा कायदेशीर संस्था, व ह्यात एखाद्या प्रकरणासाठी स्थापन केलेल्या व कायदेशीर संस्थेचा दर्जा असलेल्या स्पेशल परपज (खास) व्हेईकलचाही समावेश असू शकेल. (11) ह्यानंतर स्पष्ट करण्यात येते की, जेथे द्रवीकरण प्रक्रिया आवाहित करण्यात आली आहे, आणि आवाहित केल्यानंतर 30 दिवसांच्या आत आयसीएवर सही न केली गेल्यास लागणारी अतिरिक्त तरतुदींची आवश्यकता, त्या आयसीएच्या अपरिहार्य स्वरुपाच्या जागी/ऐवजी येत नाही तेथे, कर्जदायी बहुविध/अनेक संस्था असण्याच्या सर्व प्रकरणांमध्ये, सर्व कर्जदायी संस्थांसाठी आयसीएवर सही करणे ही एक अपरिहार्य/सक्तीची आवश्यकता आहे. ह्या विनियामक आवश्यकतेच्या अनुपालनाचे मूल्यमापन, पर्यवेक्षकीय पुनरावलोकनाचा एक भाग म्हणून, सर्व कर्जदायी संस्थांसाठी केले जाईल. आपला विश्वासु, (प्रकाश बलिअरसिंग) 26 क्षेत्रांसाठीच्या महत्त्वाच्या गुणोत्तरांच्या क्षेत्र विशिष्ट मर्यादा (मर्यादा किंवा स्तर लागु असल्यानुसार)
|