<font face="mangal" size="3">चलन वितरण व विनिमय योजनेचे (सीडीईएस) पुनरावलो&# - आरबीआय - Reserve Bank of India
चलन वितरण व विनिमय योजनेचे (सीडीईएस) पुनरावलोकन
आरबीआय/2017-18/136 मार्च 1, 2018 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/ महोदय/महोदया, चलन वितरण व विनिमय योजनेचे (सीडीईएस) पुनरावलोकन कृपया, नाणेविषयक धोरणाचे द्विमासिक पुनरावलोकन दि. फेब्रुवारी 7, 2018 च्या विभाग ब मध्ये केलेल्या घोषणेचा संदर्भ घ्यावा. अधिक सुधारित ग्राहक सेवा देण्यासाठी, त्यांच्या चलन कारभारात तंत्रज्ञान आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, निरनिराळी यंत्रे स्थापन करण्यास, आरबीआय, वेळोवेळी बँकांना अनेक प्रोत्साहने देत आली आहे. असे दिसून येते की, ह्या योजनेची बहुतांश उद्दिष्टे साध्य केली गेली आहेत. (2) ह्यासाठी, पुनरावलोकन केल्यावर, महानिर्देश डीसीएम(सीसी)क्र.जी-4/03.41.01/2016-17 दि. जुलै 20, 2016 मध्ये दिल्यानुसार, कॅश रिसायक्लर्स व फक्त कमी मूल्याच्या नोटा देणारे एटीएम स्थापन करण्यासाठी बँकांना दिली जाणारी प्रोत्साहने काढून घेण्याचे ठरविण्यात आले आहे. (3) वरील सूचनांची अंमलबजावणी ताबडतोब केली जाईल. ह्या परिपत्रकाच्या तारखेस व त्यापूर्वी बँकांना देण्यात आलेल्या यंत्रांबाबतचे दावे, वरील महानिर्देश दि. जुलै 20, 2016 मध्ये पूर्वीच दिलेल्या मर्यादित, आमच्या प्रादेशिक कार्यालयांकडून तडजोडित केले जातील. (4) हे परिपत्रक आमच्या www.rbi.org.in वेबसाईटवरही उपलब्ध आहे. आपला विश्वासु, (अजय मिच्यारी) |