<font face="mangal" size="3">बँकिंग इनफ्रास्ट्रक्चर साठीच्या केंद्रीय म - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग इनफ्रास्ट्रक्चर साठीच्या केंद्रीय माहिती प्रणालीखालील (सीआयएसबीआय) बँक/शाखा तपशील कळविणे व त्याचा नमुना ह्यात बदल
आरबीआय/2019-20/81 ऑक्टोबर 11, 2019 मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, बँकिंग इनफ्रास्ट्रक्चर साठीच्या केंद्रीय माहिती प्रणालीखालील (सीआयएसबीआय) बँक/शाखा तपशील कळविणे व त्याचा नमुना ह्यात बदल कृपया, शाखा बँकिंग सांख्यिकी - तिमाही अहवाल पाठविणे - नमुना 1 व 2 ची नवी आवृत्ती ह्यावरील आमची परिपत्रके युबीडी.सीओ.एलएस.सीआयआर.क्र./43/07.01.000/2006-07 दि. मे 9, 2007 व आरपीसीडी. सीओ.आरएफ.क्र.बीसी.9/07.06.00/2005-06 दि. जुलै 6, 2005 चा संदर्भ घ्यावा. (2) भारतीय रिझर्व बँक, भारतातील सर्व बँक शाखा/कार्यालये/अप्रशासित स्वतंत्र कार्यालये (एनएआयओ)/ग्राहक सेवा पॉईंट्स (सीएसपी) ह्यांची डिरेक्टरी ठेवीत असते (तिला ‘मास्टर ऑफिस फाईल’ (एमओएफ) प्रणाली म्हणतात) आणि ती फाईल, बँकांनी ई-मेलने पाठविलेल्या नमुना 1 व नमुना 2 वर आधारित अद्यावत केली जाते. ही प्रणाली, बँक शाखा/कार्यालये/एनएआयओ/सीएसपी ह्यांना बेसिक स्टॅटिस्टिकल रिटर्न (बीएसआर) कोड/प्राधाकृत डीलर (एडी) कोड नेमून देते. (3) शाखांना परवाने देणे व वित्तीय समावेशन धोरणांच्या आवश्यकतांना अनुसरुन, तसेच अतिरिक्त आयाम/लक्षणांच्या गरजा विचारात घेऊन, एक नवीन अहवाल प्रणाली, म्हणजेच, बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर साठीची केंद्रीय माहिती प्रणाली (सीआयएसबीआय) (https://cisbi.rbi.org.in), एनओएफ प्रणालीचे ऐवजी वेबमध्ये टाकण्यात आली आहे. (4) ह्या नव्या प्रणालीखाली, सर्व सहकारी बँकांनी, त्यांची माहिती पूर्वीप्रमाणे नमुना 1 व नमुना 2 मध्ये ई-मेलने वेगवेगळी पाठविण्याऐवजी आता त्यांची माहिती केवळ एकाच नमुन्यात (जोडपत्र) सीआयएसबीआय पोर्टलवर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. हा नवीन नमुना ऑनलाईन पाठविण्यासाठीच्या सूचना जोडपत्र 2 मध्ये दिल्या आहेत. बँकांनी पूर्वी कळविलेली सर्व माहिती सीआयएसबीआयमध्ये संक्रमित करण्यात आली असून अतिरिक्त माहिती ह्यापुढे सीआयएसबीआयवर कळविली जावी. अहवाल पाठविण्यास मदत होण्यासाठी, सीआयएसबीआय पोर्टल मध्ये, संबंधित परिपत्रके, युजर मॅन्युअल्स व संबंधित इतर कागदपत्रे आहेत. (5) सीआयएसआय मध्ये ह्यांची माहिती सादर करण्यासाठी रिझर्व बँकेने बँकांच्या नोडल ऑफिसर्सना लॉगइन ओळखपत्रे दिली आहेत. mofbsd@rbi.org.in येथे ई-मेलने विनंती करुनही सीआयएसबीआय मध्ये प्रवेश मिळविता येतो. जोडपत्र 3 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँकांनी त्यांची माहिती सीआयएसबीआय वर सादर करावी आणि त्यानंतर, सत्यांकन केल्यानुसार सीआयएसबीआय कडून शाखा/कार्यालय/एनएआयओ/सीएसपी कोड्स दिले जातील. स्थिती/दर्जामध्ये बदल झाल्यास, बँकांनी केवळ संबंधित भागातच बदल करुन सहकारी बँकांनी त्यांच्या बँक शाखा/कार्यालये/एनएआयओ/सीएसपींचे उघडणे/बंद करणे/विलीनीकरण/जागा बदलणे/आणि रुपांतरणाविषयीची माहिती, सीआयएसबीआय पोर्टलद्वारे ऑनलाईन व ताबडतोब आणि कोणत्याही परिस्थितीत एक आठवड्याच्या आत कळवावी. (6) सीएसआयबीआय वरील माहितीच्या अचूकतेची खात्री करण्यासाठी, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी असलेल्या स्थितीसाठी सीआयएसबीआयमध्ये बँकांनी एक ‘निल रिपोर्ट’ निर्माण करावा व त्यात कार्यरत असलेल्या शाखा, कार्यालये, एनएआयओसीएसपी ह्यांची एकूण संख्या निर्देशित करुन, त्याच्या खरेपणाचे सत्यांकन करुन तो सीआयएसबीआय मार्फत सादर करावा. ह्या सुविधेचा उपयोग बँका, त्यांच्या संबंधीची माहिती मिळविण्यासाठी/डाऊनलोड करण्यासाठीही करु शकतात. (7) ह्याशिवाय असेही सांगितले जात आहे की, सीआयएसबीआयमध्ये, बँक स्तरावरील संपूर्ण तपशीलवार माहिती (उदा. बँक वर्ग, बँक गट, बँक कोड दिलेल्या परवान्याचा प्रकार, पंजीकरण तपशील, कार्यकारी क्षेत्र, कार्यालयांचे पत्ते, वरिष्ठ अधिका-यांची संपूर्ण माहिती इत्यादि) आणि वेळोवेळी झालेल्या बदलांचा इतिहास ठेवायची तरतुद आहे. ह्या प्रणालीत प्रथम प्रवेश केल्यानंतर, बँकांनी, जेथे सादरीकरण/अद्यावतीकरण हक्क उपलब्ध आहेत अशा सर्व क्षेत्रात, बँक स्तरावरील माहिती अचूक व अद्यावत केलेली माहिती सादर करण्याची खात्री करुन घ्यावी. सीआयएसबीआय पोर्टलवर सुरुवातीला माहिती सादर केल्यानंतर, हे पारित दिवसापासून एक महिन्याच्या आत ‘सीआयएसबीआयवर अचूक व अद्यावत केलेली बँक स्तरीय माहिती देण्यात आली आहे’ असे सांगणारा एकवेळचा दुजोरा, बँकांनी, सहकारी बँक पर्यवेक्षण विभागाच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवावा. त्यानंतर झालेले बँक स्तरीय माहितीमधील बदल बँकांनी, सीआयएसबीआय पोर्टलवर अद्यावत करण्यासाठी ताबडतोब पाठवावेत. (8) ह्या विषयावर आतापर्यंत दिलेल्या सर्व सूचनांच्या जागी/ऐवजी ह्या सूचना दिल्या जात आहेत. आपली विश्वासु, (माला सिन्हा) सोबत : वरील प्रमाणे सीआयएसबीआय च्या वापराबाबत सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक तत्वे आरबीआय मधील विनियामक विभागांनी (म्हणजे, बँकिंग विनियम विभाग (डीबीआर) व सहकारी बँक विनियम विभाग (डीसीबीआर) ह्यांनी दिलेल्या विद्यमान शाखा प्राधिकृतीकरण परिपत्रकांनुसार, बँकांनी त्यांची सर्व बँक शाखा/कार्यालये ह्यांच्या स्थानीय व व्यवसायसंबंधित कार्यकृतींच्या माहितीचा बेस (पायाभूत माहिती) ठेवण्यासाठी रिझर्व बँक मास्टर ऑफिस फाईल (एमओएफ) प्रणाली वापरत आहे. ह्या एमओएफ प्रणालीद्वारा बेसिक स्टॅटिस्टिकल रिर्टन्स (बीएसआर) कोड्स (पार्ट 1 व पार्ट 2) दिले जातात. (2) शाखांना परवाने देण्याच्या व वित्तीय समावेशनाच्या धोरणांच्या गरजांनुसार, तसेच अतिरिक्त आयाम/लक्षणे सुरक्षित रितीने समावून घेण्याच्या गरजेनुसार, ह्या एमओएफ प्रणाली ऐवजी, 'बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर साठीची केंद्रवर्ती माहिती प्रणाली (सीआयएसबीआय)' ठेवण्यात आली आहे. सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभागातील (डीएसआयएम) बँक शाखा सांख्यिकी विभाग (बीबीएसडी), भारतीय रिझर्व बँक, हे सीआयएसबीआयसाठी नोडल युनिट असेल आणि ते एकक, आरबीआयचे इतर विभाग, बँका, अन्य वित्तीय संस्था व स्टेकहोल्डर्सशी सहकार्य करील. (3) ह्या नव्या प्रणालीखाली, बँका, शाखा, कार्यालय, एनएआयओ, इतर स्थिर ग्राहक सेवा बिंदु (सीएसपी) (उदा. एसीएम्स इत्यादि) ह्यांच्याशी संबंधित माहिती सीआयएसबीआयमध्ये सादर केलीच पाहिजे. सीआयएसबीआयमध्ये प्रवेश करण्यासाठी, प्रत्येक बँकेला दोन प्रकारचे युजर आयडी दिले जातात - (1) ‘बँक अॅडमिन आयडी’ व (2) ‘बँक युजर आयडी’ आरबीआय (डीएसआयएम बीबीएसडी) प्रत्येक बँकेसाठी एकच ‘बँक अॅडमिन आयडी’ निर्माण करील व ती बँक, ‘अॅडमिन आयडी’ चा वापर करुन अनेक ‘बँक युजर आयडी’ निर्माण करील. ह्या ‘बँक अॅडमिन आयडी’चा वापर करुन बँका, त्यांच्या बँकेशी संबंधित असलेली माहिती अद्यावत करु शकतील आणि नवीन शाखा/कार्यालये/एनएआयओ/सीएसपी कळवू शकतील किंवा हे दोन्हीही आयडी वापरुन, विद्यमान शाखा/कार्यालये/एमएआयओ/सीएसपी ह्याचा दर्जा/पत्तामधील बदल, त्या बंद केल्या जाणे, विलिनीकरण, रुपांतरण, अद्यावतीकरण इत्यादि कळवू शकतील. तथापि, केवळ ‘बँक अॅडमिन आयडी’च (बँक युजर आयडी नव्हे) त्यांच्या बँकेशी संबंधित माहितीमध्ये बदल करु शकेल. (4) सर्व सहकारी बँकांनी वरील माहिती सीआयएसबीआयमध्ये सादर करणे आवश्यक आहे, आणि आरबीआयकडून त्याचे सत्यांकन करुन ती माहिती प्रसिध्द केली जाईल. ‘बँक अॅडमिन आयडी’ मिळविण्यासाठी बँकेने एक प्राधिकृत ई-मेल आयडी द्यावा व त्यावर आरबीआय (डीएसआयएम-बीबीडी), दोन वेगवेगळ्या ई-मेल्सने त्याचा पासवर्ड पाठवील. सीआयएसबीआयवर रिपोर्ट करण्यासाठी त्यात प्रवेश मिळविण्यासाठी नव्या बँकेने, आरबीआयला (डीएसआयएम-बीबीएसडी)शी एका विनंती पत्राने संपर्क साधावा व सोबत त्या बँकेची नोडल व्यक्ती, लॉगइन क्रेडेंशियल्स स्वीकारण्यासाठी ई-मेल आयडी व खाली दिलेली काही मूलभूत कागदपत्रे जोडावीत. (अ) सहकारी सोसायट्यांचे पंजीयक/सहकारी सोसायट्यांचे केंद्रीय पंजीयक ह्यांच्याकडून मिळालेले इनकॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र. (ब) बँकिंग व्यवसाय करण्यासाठी आरबीआयने दिलेला परवाना/प्राधिकृतीकरण (क) भारतामध्ये व्यवसाय सुरु केला असल्याचे पत्र (ड) व्यवहार सुरु केला असल्याबाबत आरबीआयने दिलेले वृत्तपत्र निवेदन (ई) पंजीकृत उप-नियमांची प्रत. (5) वर निर्दिष्ट केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, आरबीआय (डीएसआयएम-बीएसबीडी) प्रणालीमध्ये त्या बँकेचे ‘बेसिक डिटेल्स’ भरुन, तिचे खाते सीआयएसबीआय प्रणालीत उघडील. (6) त्या बँकेच्या ई-मेल आयडीवर, ‘बँक अॅडमिन आयडी’ व तिचा पासवर्ड (दोन वेगवेगळ्या ई-मेलने) पाठवील. (7) देण्यात आलेल्या ‘बँक अॅडमिन आयडी’चा वापर करुन त्या बँकेने सीआयएसबीआय पोर्टलवर (https://cisbi.rbi.org.in) लॉगइन करावे आणि प्रथम लॉगइन वरील देण्यात आलेला पासवर्ड बदलावा. (8) बँकेने तिच्याशी संबंधित असलेली इतर सर्व माहिती भरुन ती सीआयएसबीआय पोर्टलवर सादर करावी. सीआयएसबीआय मधील माहितीचे सत्यांकन करुन आरबीआय ती प्रसिध्द करील. (9) बँक संबंधीची सर्व माहिती सादर केल्यानंतर, सीआयएसबीआय बँक कोड व बँक वर्किंग कोड निर्माण करील. (10) बँक कोड/बँक वर्किंग कोड मिळाल्यानंतर, ती बँक तिच्या अंतर्गत युजर्ससाठी ‘बँक युजर्स आयडी’ निर्माण करु शकते. ह्या ‘बँक युजर्स आयडी’चे व्यवस्थापन ही केवळ त्या बँकेचीच जबाबदारी असेल. (11) बँका, त्यांच्या नवीन शाखा/कार्यालय/एमएआयओ/सीएसपी संबंधीची माहिती, नमुन्यानुसार, ‘बँक अॅडमिन आयडी’ किंवा ‘बँक युजर आयडी’ ह्यांच्या द्वारे लॉगइन करुन सादर करु शकतात. (12) विद्यमान माहितीमधील कल कळविण्यासाठी बँकांनी विद्यमान माहिती सुधारित करावी आणि बदल केल्याची तारीख निर्देशित करावी. (13) बँका त्यांच्या संबंधीची माहिती मिळविण्यासाठी/डाऊनलोड करण्यासाठी ह्या सुविधेचा उपयोग करु शकतात. (14) ‘नमुना भरण्यासाठीच्या सूचना’ जोडपत्र 2 मध्ये दिल्या आहेत. (15) बँकांनी दर तीन महिन्यांनी पासवर्ड रिसेट करावा. पासवर्ड संपल्यास किंवा विसरल्यास त्या सीआयएसबीआयवर लॉगइन करुन, (अ)’बँक युजर आयडी’ साठीचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी ‘बँक अॅडमिन आयडी’ चा वापर करु शकतात आणि (ब) ‘सीआयएसबीआय’ शी संपर्क करु शकतात. (16) हे सर्व बदल प्रणालीमध्ये परिवर्तित असतील व त्यानुसार ते केवळ आरबीआयच्या मंजुरीनेच डेटाबेसमध्ये जातील. (17) निल रिपोर्ट :- निल रिपोर्ट हा, त्या बँकेची महिन्याच्या शेवटच्या तारखेस असलेली स्थिती दर्शवील, म्हणजे, कार्यकारी शाखा/कार्यालये/एनएआयओ/इतर स्थिर स्थानीय ग्राहक सेवा स्थळे (सीएसपी, एटीएम इत्यादि) तसेच त्या महिन्यात उघडलेली/बंद केलेली शाखा/कार्यालय इत्यादि दर्शवील. हा रिपोर्ट सीआयएसबीआय मध्येच निर्माण होईल आणि बँका सत्यांकन करतील की सीआयएसबीआय मधील माहिती सत्य व अद्यावत आहे. सीआयएसबीआयने निर्माण केलेला ‘निल रिपोर्ट’ आणि प्रत्यक्ष स्थिती ह्यात बँकांना काही फरक आढळल्यास, त्या बँकेने सर्वप्रथम सीआयएसबीआयमधील माहिती अद्यावत करावी व त्यानंतर ‘निल रिपोर्ट’ निर्माण करुन तो सीआयएसबीआयमार्फत सादर करावा. (हार्ड कॉपी देण्याची आवश्यकता नाही). (18) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, सहकारी बँकांनी मागील महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या स्थितीवर ‘निल रिपोर्ट’ निर्माण करावा, त्याचे सत्यांकन करुन तो सीआयएसबीआयवर सादर करावा. उदाहरणार्थ, जून 2019 साठीचा ‘निल रिपोर्ट’ जुलै 2019 च्या शेवटच्या आठवड्यात निर्माण करुन सादर केला जाईल. |