<font face="mangal" size="3">जोखीम व्यवस्थापन व आंतर बँकीय व्यवहार - विदेश - आरबीआय - Reserve Bank of India
जोखीम व्यवस्थापन व आंतर बँकीय व्यवहार - विदेशी मुद्रा जोखमीचे हेजिंग - अंमलबजावणीची तारीख
आरबीआय/2019-20/232 मे 18, 2020 प्रति, अधिकृत विक्रेता श्रेणी – I महोदय/महोदया, जोखीम व्यवस्थापन व आंतर बँकीय व्यवहार - विदेशी मुद्रा जोखमीचे हेजिंग - अंमलबजावणीची तारीख. ए.पी. (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.29 दि. एप्रिल 7, 2020 अन्वये, विदेशी मुद्रा जोखमीचे हेजिंगवरील निर्देशांचा संदर्भ घेण्यास सांगण्यात येत आहे. हे निर्देश जून 1, 2020 पासून जारी होणार होते. (2) मार्केटमधील सहभागींनी केलेल्या विनंत्या व कॉरोना व्हायरस रोगाचा (कोविड-19) देशव्यापी प्रसार ह्यांच्या संदर्भात, आता हे निर्देश, सप्टेंबर 1, 2020 पासून जारी करण्याचे ठरविण्यात आले आहे. (3) ए.पी. (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.23, दि. मार्च 27, 2020 अन्वये देण्यात आलेले, ऑफ शोअर नॉन-डिलीव्हरेबल रुपी डेरिवेटिव मार्केट्समध्ये बँकांच्या भाग घेण्यावरील निर्देश जून 1, 2020 पासून जारी होतील. (4) ह्या परिपत्रकात देण्यात आलेले निर्देश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 च्या (1999 चा 42) कलम 10(4) व 11(1) खाली देण्यात आले असून, ते अन्य कोणत्याही अधिनियमाखाली आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरींच्या विपरीत नाहीत. आपला विश्वासु, (डिंपल भंदिया) |