RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
ODC_S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78509704

रुपये निकासी व्यवस्था - पंतप्रधानांच्या सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम – केअर्स) फंडामध्ये प्रेषण

आरबीआय/2019-20/208
ए.पी.(डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 28

एप्रिल 3, 2020

प्रति,

सर्व अधिकृत विक्रेता श्रेणी – I बँका

महोदय / महोदया,

रुपये निकासी व्यवस्था - पंतप्रधानांच्या सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम – केअर्स) फंडामध्ये प्रेषण

प्राधिकृत डीलर वर्ग-1 (एडी कॅट-1) बँकांचे लक्ष, रुपी ड्रॉईंग अरेंजमेंट (आरडीए) वाहिनीखाली परवानगी असलेल्या व्यवहारांबाबत, महानिर्देश - अनिवासी विनिमय गृहांची रुपये/विदेशी मुद्रा व्होस्ट्रो खाती उघडणे व ठेवणे, दि. जानेवारी 1, 2016 च्या परिच्छेद 4 कडे वेधण्यात येत आहे.

(2) कॉरोना व्हायरस (कोविड-19) साथीच्या देशव्यापी प्रसाराच्या संदर्भात, भारत सरकारशी सल्लामसलत करुन ठरविण्यात आले आहे की, पंतप्रधानांच्या सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम – केअर्स) फंडाच्या नावे, अनिवासी व्यक्तींकडून अनिवासी विनिमय गृहांमार्फत आलेली आवक-प्रेषणे प्राप्त करण्यास परवानगी दिली जावी - मात्र त्यासाठीची अट म्हणजे, एडी कॅट-1 बँका ही प्रेषणे थेट त्या फंडात क्रेडिट करतील व प्रेषणांची संपूर्ण माहिती ठेवतील.

(3) वरील बदल समाविष्ट करण्यासाठी, महानिर्देश - अनिवासी विनिमय गृहांची रुपये/विदेशी मुद्रा खाती उघडणे व ठेवणे, दि. जानेवारी 1, 2016 सुयोग्यतेने अद्यावत केले जातील.

(4) ह्या परिपत्रकातील निर्देश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या (1999 चा 42) कलम 10(4) व 11(1) खाली आणि अन्य कोणत्याही कायद्याखाली असलेल्या परवानग्या/मंजुरींच्या विपरीत नाहीत.

आपला विश्वासु,

(अजय कुमार मिस्रा)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?