<font face="mangal" size="3"> हेल्ड टु मॅच्युरिटी (एचटीएम) वर्गात ठेवलेल्य&# - आरबीआय - Reserve Bank of India
हेल्ड टु मॅच्युरिटी (एचटीएम) वर्गात ठेवलेल्या सिक्युरिटीजची विक्री - लेखा कर्म
आरबीआय/2018-19/205 जून 10, 2019 सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. महोदय/महोदया, हेल्ड टु मॅच्युरिटी (एचटीएम) वर्गात ठेवलेल्या सिक्युरिटीजची विक्री - लेखा कर्म कृपया, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांद्वारे (युसीबी) गुंतवणुकींवरील महापरिपत्रक डीसीबीआर.बीपीडी.(पीसीबी). एमसी. क्र.4/16.20.000/2015-16 दि. जुलै 1, 2015 च्या परिच्छेद 16.2 चा संदर्भ घ्यावा. ह्यात आम्ही सांगितले होते की, परिपक्व होईपर्यंत धारण करण्याच्या हेतूने बँकांनी मिळविलेल्या सिक्युरिटीज् एचटीएम प्रवर्गाखाली वर्गीकृत केल्या जातील. (2) ह्या संदर्भात येथे पुनश्च सांगण्यात येते की, एचटीएम प्रवर्गात धारण केलेल्या सिक्युरिटीजची विक्री करणे युसीबींकडून अपेक्षित नाही. तथापि, तरलतेच्या ताणतणावामुळे, एचटीएम वर्गातील सिक्युरिटींची विक्री करणे युसीबींसाठी आवश्यक असल्यास, त्यांच्या संचालक मंडळाची परवानगी घेऊन त्या तसे करु शकतात व अशा विक्री बाबतची तत्वमीमांसा नोंद करुन ठेवली जावी. एचटीएम प्रवर्गातील केलेल्या गुंतवणुकींपासून झालेला लाभ, सर्वप्रथम नफा-तोटा खात्यात प्रविष्ट केला जावा व त्यानंतर, अशा लाभाची रक्कम, वैधानिक विनियोजनानंतरच्या वर्षाच्या नक्त नफ्यामधून ‘भांडवली राखीव निधी’ मध्ये विनियोजित केली जावी. विक्रीतून झालेला तोटा, त्या विक्रीच्या वर्षामधील नफा-तोटा लेखेमध्ये दर्शविला जावा. आपला, (नीरज निगम) |