<font face="mangal" size="3">श्री बी पी कानुनगो ह्यांची आरबीआयचे डेप्युटì - आरबीआय - Reserve Bank of India
श्री बी पी कानुनगो ह्यांची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणुक
एप्रिल 3, 2017 श्री बी पी कानुनगो ह्यांची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणुक श्री बी पी कानुनगो ह्यांची आज भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. मार्च 11, 2017 रोजी भारत सरकारने, एप्रिल 3, 2017 रोजी किंवा त्यानंतर किंवा पुढील आदेश दिले जाईपर्यंत (ह्यापैकी जे आधी असेल तसे) त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी, भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणुक केली आहे. डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदोन्नती दिली जाण्यापूर्वी श्री कानुनगो हे रिझर्व बँकेचे कार्यकारी संचालक होते. डेप्युटी गव्हर्नर म्हणून, श्री कानुनगो, पुढील विभागांचे कामकाज पाहतील - चलन व्यवस्थापन विभाग (डीसीएम), बाह्य गुंतवणुकी व कार्यकृती विभाग (डीईआयओ), सरकार व बँक खाती विभाग (डीजीबीए), माहिती तंत्रज्ञान विभाग (डीआयटी), प्रदान व समायोजन प्रणाली विभाग (डीपीएसएस), विदेशी मुद्रा विभाग (एफईडी), अंतर्गत कर्ज व्यवस्थापन विभाग (आयडीएमडी), कायदे विभाग (एलडी) आणि कार्यालये विभाग (पीडी). सेंट्रल बँकेत करियर करणारे श्री. कानुनगो, सप्टेंबर 1982 मध्ये रिझर्व बँकेत रुजु झाले. त्यांनी ह्या बँकेमधील, विदेशी मुद्रा व्यवस्थापन, बँकिंग व नॉन बँकिंग सुपरव्हिजन, चलन व्यवस्थापन, सरकारी व बँक खाती आणि सार्वजनिक कर्ज ह्या सारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रात काम केले आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यांच्या बँकिंग लोकपाला व्यतिरिक्त, त्यांनी रिझर्व बँकेच्या जयपुर व कोलकाता येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी विदेशी मुद्रा व्यवस्थापन, अंतर्गत ऋण व्यवस्थापन आणि सरकारी व बँक खाती ह्या विभागांचेही काम पाहिले आहे. श्री. कानुनगो ह्यांचा जन्म मे 5, 1959 रोजी झाला असून, ते कायद्याचे पदवीधारकही असून त्यांनी उत्कल विश्वविद्यालयाची ह्युमॅनिटीज मधील मास्टर्स डिग्रीही मिळविली आहे. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2659 |