RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78490028

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर्स, श्री. आर गांधी व श्री. एस एस मुंद्रा ह्यांचेकडून चलन संबंधित प्रश्नांबाबत माहिती : संकलित प्रतिलेख

डिसेंबर 13, 2016

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर्स, श्री. आर गांधी व श्री. एस एस मुंद्रा ह्यांचेकडून चलन संबंधित
प्रश्नांबाबत माहिती : संकलित प्रतिलेख

व्हिडियो लिंक

श्री. आर गांधी :

  • नोव्हेंबर 10, 2016 रोजी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून ते डिसेंबर 10, 2016 पर्यंत, बँकांनी त्यांच्या काऊंटर्सवरुन आणि त्यांच्या एटीएम मधून जनतेला रु.4.61 लाख कोटी मूल्याच्या नोटा दिल्या आहेत.

  • डिसेंबर 10, 2016 रोजी असल्यानुसार, आरबीआय व करन्सी चेस्ट्स ह्यांचेकडे परत केलेल्या रु.500 व रु.1000 मूल्याच्या विहित बँक नोटांचे (एसबीएन) मूल्य रु.12.44 लाख कोटी आहे.

  • ह्या कालावधीमध्ये, आरबीआयनेही, बँका व तिच्या शाखांमार्फत निरनिराळ्या मूल्यांमधील 21.8 बिलियन नोटा जनतेला दिल्या असून, त्यापैकी, 20.1 बिलियन नोटा, रु.10, 20, 50 व 100 मूल्याच्या असून, 1.7 बिलियन नोटा, रु.2000 व रु.500 मूल्याच्या आहेत.

  • अशा प्रकारे, जनतेला नोटा मिळण्यासाठी संपूर्ण प्रणाली सातत्याने राबविण्यात येत आहे. आम्ही दररोज अधिकाधिक नोटा छापून त्या देत/पुरवीत आहोत. हा सातत्याने केला जात असलेला प्रयत्न असून जनतेला विनंती करण्यात येत आहे की त्यांच्याकडे असलेल्या नोटा त्यांनी साठवून ठेवण्याऐवजी मुक्तपणे वापराव्यात.

श्री एस एस मुंद्रा

  • निरनिराळ्या बँक शाखांमध्ये शंकास्पद व्यवहार झाले असल्याबाबत किंवा काही बँका/शाखांमधील कर्मचारी ह्यांचा शंकास्पद व्यवहारांमध्ये सहभाग असल्याबाबतही माध्यमांकडून अनेक रिपोर्ट आले आहेत.

  • येथे मी निर्देशित करु इच्छितो की, ह्या प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच बँकिंग उद्योगाने चांगली कामगिरी केली आहे. बँक कर्मचा-यांनी खूप प्रयत्न केले असून त्यातील बहुतेकांनी प्रशंसाही निश्चितपणे मिळविली आहे.

  • हे सांगितल्यानंतरही अशा मोठ्या आकारमानाच्या कार्यकृतीमध्ये देखील त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या वर्तणुकी विरुध्द वर्तणुक असलेले घटक नेहमीच असतात आणि आम्ही त्यावर सातत्याने नजर ठेवून आहोत. आम्ही सर्व बँक व्यवस्थापनांना केंद्रीकृत डेटा चेकिंग करण्यासाठी सविस्तर सूचना दिल्या असून त्यात काही वावगे आढळल्यास, त्यांनी त्याबाबत अंतर्गत ऑडिटमार्फत पाठपुरावा करण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे.

  • आरबीआयचे पर्यवेक्षकरी, बँकांच्या माहितीवर अशाच प्रकारचे कार्य करत असून, एखादे अवाजवी व्यवहार किंवा कृती दिसून आल्यास योग्य ती चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाईही केली जाईल.

  • बँकांनी त्यांच्या कर्मचा-यांविरुध्द कारवाई केल्याची काही प्रकरणेही दिसून आली आहेत.

  • बंगळुरु येथील आरबीआयच्या एका कर्मचा-याबाबतही माध्यमाकडून एक रिपोर्ट आला आहे. येथे मी स्पष्ट करु इच्छीतो की, तो बंगळुरु येथील भारतीय रिझर्व बँकेचा एक कनिष्ठ कर्मचारी होता आणि तपासणी करणा-या एजन्सीकडून कळविण्यात आले की, तो कर्मचारी, शंकास्पद व्यवहार होत असलेल्या एका बँक शाखेत उपस्थित असल्याचे नोंदण्यात आले आहे. हे समजल्यानंतर संबंधित कर्मचा-याला निलंबित करण्यात आले असून आम्ही त्याबाबत चौकशी सुरु केली असून मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

  • शंकास्पद व्यवहारांची माहिती मिळाल्यावर, भारतीय रिझर्व बँक, निरनिराळ्या तपासणी-एजन्सीज् बरोबर समन्वय व सहकार्य करत आहे. मला वाटते की, तुम्हा सर्वांना माहितच आहे की, सर्व बँका तसेच भारतीय रिझर्व बँकेकडेही एक धोकादर्शक संस्था/यंत्रणा असून, अशा प्रकारच्या अभियानामध्ये, अशी काही माहिती मिळाल्यास, ती माहिती, धोकादर्शक यंत्रणेद्वारा आम्हाला दिली जावी आणि योग्य ती प्रक्रिया सुरु केली जाईल.

  • पीटीआयचा प्रश्न : अॅक्सिस बँकेला कारणे दाखवा नोटिस देण्यात आली असल्याबाबत आम्हाला रिपोर्ट्स मिळाले आहेत.

    मी सांगितल्याप्रमाणे आता तरी असे काहीच नाही. जेव्हा जेव्हा अशा घटना कळविल्या जातात तेव्हा चौकशी केली जाते. परंतु आता तरी आमच्याकडून कोणतीही कारणे दाखवा नोटिस देण्यात आलेली नाही.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1508

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?