<font face="mangal" size="3">सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 मालिका-3</font> - आरबीआय - Reserve Bank of India
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 मालिका-3
ऑक्टोबर 06, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 मालिका-3 भारत सरकारची अधिसूचना एफ क्र. 4(25) – बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 आणि आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अन्वये, ऑक्टोबर 9, 2017 ते डिसेंबर 27, 2017 ह्या दरम्यान, प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते बुधवार ह्या दरम्यान ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, वर्गणीसाठी खुली असेल. एखाद्या दिलेल्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, ह्याचे समायोजन, पुढील आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्या दिवशी केले जाईल. ऑक्टोबर 16, 2017 ह्या समायोजनाच्या दिवसासह, ऑक्टोबर 9, 2017 ते ऑक्टोबर 11, 2017 ह्या कालावधीतील (ऑक्टोबर 4-6, 2017) वर्गणीसाठी, वर्गणी-कालाच्या पूर्वीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन व्यवहारांच्या दिवशी 999 शुध्दतेच्या सोन्याच्या सरासरी बंद किंमतीवर आधारित (इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लि. (आयबीजेए) ह्यांनी प्रसिध्द केलेली) ह्या रोख्याची नाममात्र किंमत, प्रति ग्राम, रु.2,956/-(रुपये दोन हजार नऊशे छप्पन) एवढी आहे. भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन, भारत सरकारने, ऑनलाईन अर्ज करणारांसाठी, व त्या अर्जाबाबतचे प्रदान डिजिटल पध्दतीने केल्यास, नाममात्र किंमतीत प्रति ग्राम रु.50/- सूट/सवलत देण्याचे ठरविले आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी, सुवर्ण रोख्याची किंमत, सोन्याच्या प्रति ग्रामसाठी, रु.2,906/- (रुपये दोन हजार नऊशे सहा) असेल. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/958 |