<font face="mangal" size="3">सार्वभौम सुवर्ण रोखे - डिमटेरियलायझेशन</font> - आरबीआय - Reserve Bank of India
सार्वभौम सुवर्ण रोखे - डिमटेरियलायझेशन
एप्रिल 28, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे - डिमटेरियलायझेशन भारत सरकारशी सल्लामसलत करुन भारतीय रिझर्व बँकेने, आतापर्यंत रु. 4800 कोटी एकूण मूल्याच्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या सात फे-या दिल्या आहेत. ह्या रोख्यांमधील निवेशकांना, हे रोखे प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात धारण करण्याचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. डिमटेरियलायझेशनसाठीच्या विनंत्यांवर यशस्वीपणे प्रक्रिया करण्यात आली आहे. तथापि, रेकॉर्ड्सच्या एका संचावर निरनिराळ्या कारणांनी (नावे व संबंधित पॅन क्र. न जुळणे, अकार्यकारी किंवा बंद झालेली डिमॅट खाती) प्रक्रिया करता येऊ शकली नाही. प्रक्रिया करण्यात अपयश आलेल्या अशा डिमॅट विनंत्यांची यादी /en/web/rbi/debt-management/other-links/sovereign-gold-bonds वर आता टाकण्यात आली आहे. त्यामध्ये देण्यात आलेली माहिती फेरीनिहाय असून, त्यात स्वीकारकर्ती कार्यालये, निवेशक आयडी, आणि त्या रोख्याचे डिमटेरियलायझेशन न करण्याची कारणेही दिली आहेत. आपला निवेशक आयडी ह्या यादीत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी, निवेशक हा डेटा अॅक्सेस करु शकतात. सर्व स्वीकारर्कत्या कार्यालयांनाही त्यांच्या ग्राहकांसाठी हा डेटा अॅक्सेस करणे व त्या ग्राहकांशी सल्लामसलत करुन त्यात योग्य त्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या ई-कुबेर अॅप्लिकेशनमधील मॉडिफिकेशन विंडो ह्यासाठी खुली आहे. आम्ही येथे सांगू इच्छितो की, प्रलंबित स्थिती असूनही, आरबीआयच्या पुस्तकात, सार्वभौम सुवर्ण रोखे नोंद करणे सुरुच राहील आणि त्यावर नियमित सेवा दिली जाईल. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2928 |