सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 4
फेब्रुवारी 23, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 4 भारत सरकारशी सल्लामसलत करुन, भारतीय रिझर्व बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17, मालिका 4 देण्याचे ठरविले आहे. ह्या रोख्यांसाठीचे अर्ज, फेब्रुवारी 27, 2017 ते मार्च 3, 2017 पर्यंत स्वीकारले जातील. हे रोखे मार्च 17, 2017 रोजी दिले जातील. ह्या रोख्यांची विक्री, बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआयएल), नेमलेली पोस्ट ऑफिसे आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजेस (म्हणजे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि., व बाँबे स्टॉक एक्सचेंज) मार्फत केली जाईल. ह्या रोख्यांची लक्षणे/गुणविशेष पुढीलप्रमाणे आहेत.
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2274 |
पेज अंतिम अपडेट तारीख: