<font face="mangal" size="3">सार्वभैाम सुवर्ण रोखे, 2015-16</font> - आरबीआय - Reserve Bank of India
सार्वभैाम सुवर्ण रोखे, 2015-16
आरबीआय /2015-16/245 नोव्हेंबर 24, 2015 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक – महोदय/महोदया, सार्वभैाम सुवर्ण रोखे, 2015-16 सार्वभैाम सुवर्ण रोखे योजनेवरील आमचे परिपत्रक आयडीएमडी आयडीएमडी.सीडीडी.क्र. 939/14.04.050/2015-16, ऑक्टोबर 30, 2015 चा कृपया संदर्भ घ्यावा. 2. ह्या सार्वभैाम सुवर्ण रोख्यांच्या प्रचालनाची/देण्याची तारीख नोव्हेंबर 26, 2015 च्या ऐवजी नोव्हेंबर 30, 2015 करण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्याबाबत, परिपत्रक आयडीएमडी आयडीएमडी.सीडीडी.क्र. 968/14.04.050/2015-16, नोव्हेंबर 4, 2015 अन्वये दिलेल्या कार्यकारी मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ घेण्यात यावा. त्यात सांगण्यात आले होते की, प्रदान वसुलीच्या तारखेपासून ते तडजोडीच्या तारखेपर्यंत (म्हणजे त्यांचा निधी संपला असण्याचा कालावधी) अर्जदारांना प्रचलित असलेल्या बचत खात्याच्या व्याज दराने व्याज देण्यात येईल. तडजोडीची तारीख नोव्हेंबर 30, 2015 पर्यंत सरकल्याने आता, प्रदान वसुलीच्या तारखेपासून ते नवीन तडजोड-तारखेपर्यंतच्या (म्हणजे नोव्हेंबर 30, 2015) कालासाठीचे व्याज, बचत खात्याच्या प्रचलित व्याजदराने दिले जाईल. (3) वरील परिपत्रकातील इतर अटी व शर्ती तशाच राहतील आपला |