RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78491920

सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 मालिका 3 - कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

आरबीआय/2016-2017/99
आयडीएमडी.सीडीडी.क्र.894/14.04.050/2016-17

ऑक्टोबर 20, 2016

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका, (आरआरबी सोडून),
नेमलेली पोस्ट ऑफिसे,
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल),
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि.

महोदय/महोदया,

सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 मालिका 3 - कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

ह्याचा संदर्भ, सार्वभौम सुवर्ण रोख्यांवरील जीओआय अधिसूचना एफ क्र. 4 (16)- डब्ल्यु अँड एम /2016 आणि आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.893/14.04.050/2016-17 दिनांक ऑक्टोबर 20, 2016 ह्यांच्याशी आहे. ह्याबाबतचे एफएक्यु आमच्या वेबसाईटवर www.rbi.org.in टाकण्यात आले असून, ह्या योजनेबाबतची कार्यकारी मार्गदर्शक तत्वे खाली दिली आहेत.

(1) अर्ज

निवेशकांकडील अर्ज ऑक्टोबर 24, 2016 ते नोव्हेंबर 2, 2016 पर्यंत, शाखांमध्ये नेहमीच्या कामकाजाच्या वेळात स्वीकारले जातील. हे अर्ज सर्व बाबतीत पूर्णपणे भरले असल्याची खात्री स्वीकारर्कत्या कार्यालयांनी करुन घ्यावी, अपूर्ण अर्ज फेटाळण्यात येतील. आवश्यक तेव्हा अर्जदारांकडून अतिरिक्त तपशील घेण्यात येऊ शकतो. अधिक चांगली ग्राह्य सेवा देता येण्यासाठी, गुंतवणुकदारांकडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या व्यवस्था स्वीकारकर्ती कार्यालये करु शकतात.

(2) संयुक्त धारण व नामनिर्देशन

अनेक संयुक्त धारक व नामनिर्देशित (प्रथम धारकाचे) ठेवण्यास परवानगी आहे. रीतीनुसार अर्जदारांकडून अतिरिक्त माहिती घेता येऊ शकते.

(3) तुमचा ग्राहक ओळखा (केवायसी) आवश्यकता

तुमचा ग्राहक ओळखा (केवायसी) बाबतचे निकष, प्रत्यक्ष सोने खरेदीसाठी आवश्यक असल्याप्रमाणेच असेल. पासपोर्ट, परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड ह्यासारखे ओळख पटवणारे कागदपत्र केवळ अल्पवयींसाठीच आवश्यक असतील. केवायसीच्या सत्यांकनासाठी बँक खाते क्रमांकही वैध समजला जाऊ शकतो. रोखे देणा-या बँका/एसएचसीआयएल कार्यालये/पोस्ट ऑफिसे/एजंट्स ह्यांच्या मार्फतही केवायसी करता येईल.

(4) अर्जाच्या पैशांवर व्याज

प्रदान मिळाल्याच्या प्रत्यक्ष तारखेपासून ते तडजोडीच्या तारखेपर्यंत म्हणजे त्यांच्याजवळ पैसे नसल्याचा कालावधी) अर्जदारांना, विद्यमान असलेल्या बचत बँक दराने व्याज दिले जाईल. अर्जदाराचे बँक खाते स्वीकारर्कत्या बँकेत नसल्यास, त्या अर्जदाराने दिलेल्या तपशीलानुसार असलेल्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरने व्याज जमा (क्रेडिट) केले जावे.

(5) रद्दीकरण

हा इश्यु बंद होण्याच्या तारखेपर्यंत (म्हणजे नोव्हेंबर 2, 2016) अर्ज रद्द करण्यास परवानगी आहे. सुवर्ण रोखे खरेदी करण्यासाठीच्या विनंतीचे अंशतः रद्दीकरण करण्यास परवानगी नाही. अर्ज रद्द केला गेल्यास अर्ज-पैशावर कोणतेही व्याज देण्याची आवश्यकता नाही.

(6) लिएन मार्किंग

हे रोखे सरकारी प्रतिभूती असल्या कारणाने, लिएन तयार करणे इत्यादी कार्ये, सरकारी प्रतिभूती अधिनियम 2006 च्या विद्यमान वैधानिक तरतुदी व त्याखाली तयार केलेल्या नियमांनुसार असतील.

(7) एजन्सी व्यवस्था

स्वीकारकर्ती कार्यालये, त्यांच्या वतीने अर्जाचे फॉर्म्स गोळा करण्यासाठी, एनबीएफसी, एनएससी एजंट्स, एलआयसी एजंट्स व इतरांची नेमणुक करु शकतात. अशा संस्थांबरोबर, बँका व्यवस्था-करार, जोडणी करु शकतात. वितरणासाठीची दलाली, स्वीकारर्कत्या कार्यालयांना मिळालेल्या अर्जांवरील एकूण मिळालेल्या वर्गणीच्या, प्रतिशत एक रुपयाच्या दराने दिले जाईल आणि एजंट व सब एजंट ह्यांनी आणलेल्या व्यवसायासाठी, स्वीकारकर्ती कार्यालये ह्या दलालीच्या किमान 50% त्यांच्याबरोबर वाटून घेईल.

(8) आरबीआयच्या ई-कुबेर प्रणालीमधून प्रक्रिया

सार्वभौम सुवर्ण रोखे, आरबीआयच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत अनुसूचित वाणिज्य बँकांच्या शाखांमध्ये व नेमलेल्या पोस्ट ऑफिसांमध्ये वर्गणीसाठी उपलब्ध असतील. ही ई-कुबेर प्रणाली, इन्फिनेट किंवा इंटरनेट मार्फत अॅक्सेस करता येईल. स्वीकारर्कत्या बँकांनी, त्यांना मिळालेल्या वर्गणीसाठी, डेटा एंटर करणे किंवा घाऊक अपलोड करणे गरजेचे आहे. कोणत्याही चुका टाळण्यासाठी डेटा एंट्री बिनचुक करण्यात आली असल्याची खात्री त्यांनी करुन घ्यावी. अर्ज मिळाले असल्याबाबत ताबडतोब दुजोरा दिला जाईल. ह्याशिवाय, स्वीकारर्कत्या कार्यालयांना त्यांचा डेटाबेस अद्यावत करता येण्यासाठी, त्या फाईल अपलोडसाठी कन्फर्मेशन स्क्रोल दिला जाईल. वाटप करण्याच्या तारखेस, म्हणजे नोव्हेंबर 17, 2016 रोजी, एकमेव/प्रधान धारकाच्या नावाने, धारण-प्रमाणपत्र निर्माण केले जाईल, स्वीकारर्कत्या कार्यालये ते प्रमाणपत्र डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घेऊ शकतील. ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता दिला आहे अशा निवेशकांनाही, ई-मेलने, धारण-प्रमाणपत्रे पाठविली जातील. त्याबाबतच्या प्रतिभूती, वाटप केल्याच्या तारखेपासून 2-3 दिवसांच्या आत त्यांच्या डि-मॅट खात्यात जमा केल्या जातील - मात्र त्यासाठी, डिपॉझिटर्स अकाऊंटसकडे केलेल्या अर्जात त्यांनी दिलेला तपशील जुळला पाहिजे.

(9) धारण-प्रमाणपत्रे छापणे

धारण प्रमाणपत्रे, 100 जीएसएम ए4 आकाराच्या कागदावर रंगीत स्वरुपात छापली जावीत.

(10) सेवा देणे व पाठपुरावा

स्वीकारकर्ती कार्यालये, म्हणजे, अनुसूचित वाणिज्य बँकांच्या शाखा, नेमलेली पोस्ट ऑफिसे, एससीएचआयएल आणि स्टॉक एक्सचेंजेस (एनएसई व बीएसई) ग्राहकाला ‘स्वतःच’ समजून त्या रोख्यांबाबत आवश्यक त्या सेवा (म्हणजे संपर्क तपशील अद्यावत करणे, मुदतपूर्व रोखी करणासाठीच्या विनंत्या स्वीकारणे, इत्यादि) उपलब्ध करुन देतील. हे रोखे परिपक्व होऊन त्यांचे पुनर् प्रदान केले जाईपर्यंत, स्वीकारकर्ती कार्यालये ते जपून ठेवतील.

(11) व्यापार-क्षमता

भारतीय रिझर्व बँकेकडून अधिसूचित केलेल्या तारखेस हे रोखे ट्रेडिंग करण्यास पात्र असतील (येथे नोंद घेण्यात यावी की केवळ डिपॉझिटर्समध्ये डि-मॅट स्वरुपात ठेवलेल्या रोख्यांचेच स्टॉक एक्सचेंजेसमध्ये ट्रेडिंग केले जाऊ शकते).

(12) संपर्क तपशील

काही प्रश्न/स्पष्टीकरणे ह्यासाठी पुढे दिल्यानुसार ई-मेल पाठवावा.

(अ) सार्वभौम सुवर्ण रोखे संबंधित - ई-मेल पाठविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
(ब) आयटी संबंधित - ई-मेल पाठविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

आपला

राजेंद्र कुमार
महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?