<font face="mangal" size="3">सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 - मालिका 1</font> - आरबीआय - Reserve Bank of India
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 - मालिका 1
आरबीआय/2016-17/289 एप्रिल 20, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 - मालिका 1 अधिसूचना एफ.क्र 4(8)- (ड्ब्ल्यु अँड एम)/2017 दि. एप्रिल 20, 2017 अन्वये भारत सरकारने घोषित केले आहे की, सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 - मालिका 1 (हे रोखे), एप्रिल 24, 2017 ते एप्रिल 28, 2017 पर्यंत वर्गणीसाठी खुले असतील. विहित कालावधीपूर्वीही, पूर्व सूचना देऊन भारत सरकार ही योजना बंद करु शकते. हे रोखे देण्याबाबतच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असतील : (1) गुंतवणुकीसाठीची पात्रता भारतात निवास करत असलेली, एक व्यक्ती, अशी व्यक्ती म्हणून असलेल्या क्षमतेत किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर संयुक्तपणे हे रोखे धारण करु शकते. त्याचप्रमाणे, एखादा ट्रस्ट, धर्मादाय संस्था व विश्वविद्यालयाद्वारेही हे रोखे धारण केले जाऊ शकतात. ‘भारतात निवासी असलेली व्यक्ती’ ची व्याख्या, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या 2 (यु) सह वाचित, कलम 2 (व्ही) मध्ये करण्यात आली आहे. (2) प्रतिभूतीचे स्वरुप हे रोखे, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 च्या कलम 3 नुसार, भारत सरकारच्या स्टॉकच्या स्वरुपात दिले जातील. हे रोखे, डिमॅट स्वरुपात परिवर्तित करण्यास पात्र असतील. निवेशकांना एक धारण प्रमाणपत्र (फॉर्म सी) दिले जाईल. (3) देण्याची तारीख हे रोखे, मे 12, 2017 रोजी दिले जातील. (4) मूल्य ह्या रोख्यांचे मूल्यांकन एक ग्राम सोन्याच्या एककांमध्ये व त्याच्या पटीत केले जाईल. ह्या रोख्यांमधील किमान गुंतवणुक एक ग्राम व वर्गणीची कमाल मर्यादा, प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल-मार्च), प्रति व्यक्ती पाचेशे ग्राम असेल. (5) प्रचालनाचे मूल्य ह्या रोख्यांचे मूल्य भारतीय रुपयांमध्ये, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. ह्यांनी प्रसिध्द केलेल्या वर्गणी कालावधी-आधीच्या आठवड्यामधील (सोमवार ते शुक्रवार) 999 शुध्दतेच्या बंद बाजार भावाच्या सध्य सरासरीवर आधारित असेल. हे प्रचलन मूल्य, नाममात्र मूल्यापेक्षा रु.50 प्रतिग्रामने कमी असेल. (6) व्याज सुरुवातीच्या गुंतवणुक रकमेवर, ह्या रोख्यांवर 2.50 टक्के (स्थिर दर) व्याज दिले जाईल. हे व्याज सहामाही अवकाशाने दिले जाईल व शेवटचे व्याज मुद्दलासह, परिपक्वतेनंतर दिले जाईल. (7) स्वीकारकर्ती कार्यालये अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून), नेमलेली पोस्ट ऑफिसे (अधिसूचित केल्यानुसार), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआयएल) आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. व बाँबे स्टॉक एक्सचेंज लि. ह्यांना, थेट किंवा एजंटांच्या मार्फत, ह्या रोख्यांसाठीचे अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. (8) प्रदानाचे पर्याय ह्यासाठीचे प्रदान भारतीय रुपयांमध्ये रोखीने कमाल रु. 20,000/- पर्यंत किंवा डिमांड ड्राफ्टने किंवा चेकने किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग मार्फत स्वीकारले जाईल. चेक किंवा डिमांड ड्राफ्टने प्रदान केले गेल्यास ते स्वीकारर्कत्या कार्यालयाच्या नावावर काढलेले असावेत. (9) विमोचन (1) हे रोखे, सुवर्ण रोखे दिल्याच्या तारखेपासून (मे 12, 2017) आठ वर्षे पूर्ण झाल्यावर पुनर् प्रदानासाठी पात्र असतील. ह्या रोख्यांचे मुदतपूर्व पुनर् प्रदान करण्यास, व्याज प्रदानाच्या तारखांपासून पाचव्या वर्षापासून करण्यास परवानगी आहे. (2) ह्या रोख्यांच्या विमोचनाचे मूल्य, आयबीजेएने मागील आठवड्यामधील (सोमवार ते शुक्रवार) 999 शुध्दतेच्या बंद बाजारभावाच्या साध्य सरासरींच्या आधारावर ठरविले जाईल. (3) ह्या रोख्यांच्या परिपक्वतेच्या एक महिना आधी, स्वीकारकर्ती बँक, निवेशकाला, परिपक्वतेची तारीख कळवील. (10) परतफेड ह्या रोख्यांच्या परिपक्वतेच्या एक महिना आधी, स्वीकारकर्ती बँक, निवेशकाला, परिपक्वतेची तारीख कळवील. (11) वैधानिक लिक्विडिटी रेशो (एसएलआर) साठीची पात्रता ह्या रोख्यांमधील गुंतवणुक एसएलआरसाठी पात्र असेल. (12) ह्या रोख्यांविरुध्द कर्ज हे रोखे, कर्जांसाठी तारण म्हणून वापरता येतील. ह्यासाठीचे कर्ज/मूल्य गुणोत्तर, आरबीआयने सर्वसामान्य सुवर्ण कर्जासाठी वेळोवेळी अपरिहार्य केल्यानुसारच लागु असेल. ह्या रोख्यांवरील लिएन, प्राधिकृत बँकांकडून डिपॉझिटरीमध्ये मार्क केले जाईल. (13) करविषयक वागणुक आय कर अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार ह्या रोख्यांवरील व्याज करपात्र असेल. एखाद्या व्यक्तीला, ह्या एसजीबींचे विमोचन केल्यामुळे निर्माण झालेल्या भांडवली लाभ कराला सूट देण्यात आली आहे. ह्या रोख्यांचे हस्तांतरण केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीबाबत निर्माण झालेल्या दीर्घकालीन भांडवली लाभांना इंडेक्सेशन लाभ दिले जातील. (14) अर्ज ह्या रोख्यांसाठीचे अर्ज, विहित केलेल्या अर्जाच्या फॉर्म मध्ये (फॉर्म अ) किंवा त्याच्यासारख्याच स्वरुपातील अन्य फॉर्म मध्ये केले जावेत आणि त्यात, सोन्याचे ग्राम्स व अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता स्पष्टपणे दिला जावा. स्वीकारकर्ते कार्यालय अर्जदाराला, फॉर्म ब मध्ये त्याची पोचपावती देईल. (15) नामनिर्देशन नामनिर्देशन व त्याचे रद्दीकरण, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 (2006 चा 38) आणि भारतीय राजपत्र दि. डिसेंबर 1, 2007 च्या विभाग 3, कलम 4 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या, सरकारी प्रतिभूती अधिनियम 2007 च्या तरतुदीनुसार, अनुक्रमे फॉर्म डी व फॉर्म ई मध्ये केले जाईल. (16) हस्तांतरणीयता सरकारी प्रतिभूती अधिनियम 2006 (2006 चा 38) आणि भारतीय राजपत्र, दि. डिसेंबर 1, 2007 च्या विभाग 3, कलम 4 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या, सरकारी प्रतिभूती अधिनियम 2007 च्या तरतुदीनुसार, हे रोखे, फॉर्म एफ मध्ये दिलेला, हस्तांतरण संलेख तयार करुन हस्तांतरणीय असतील. (17) रोख्यांची व्यापार क्षमता हे रोखे, ते दिले गेल्यानंतर पधरा दिवसांच्या आत, आरबीआय ने अधिसूचित केलेल्या तारखेस व्यापारक्षम (ट्रेडेबल) असतील. (18) वितरणासाठीची दलाली वितरणासाठीची दलाली, स्वीकारर्कत्या कार्यालयांना मिळालेल्या अर्जांबाबत मिळालेल्या एकूण वर्गणीच्या, रुपया एक प्रति शत ह्या दराने, स्वीकारर्कत्या कार्यालयांना दिली जाईल. आणि त्यापैकी किमान 50% दलालीची रक्कम, स्वीकारर्कत्या कार्यालयांनी, एजंट व सब एजंटांना, त्यांनी आणलेल्या व्यवसायासाठी देण्यात यावी. (19) भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (आर्थिक कार्ये विभाग), अधिसूचना क्र. एफ क्र.4(13) ड्ब्ल्यु अँड एम /2008, दि. 8 ऑक्टोबर 2008 मध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती ह्या रोख्यांनाही लागु असतील. (20) सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 - मालिका 1 संबंधीची मार्गदर्शक तत्वे, परिपत्रक आयडीएमडी. सीडीडी. क्र. 2759/14.04.050/2016-17 दि. एप्रिल 20, 2017 अन्वये देण्यात आली आहेत. आपली विश्वासु, (शायनी सुनिल) |