RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78485989

सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 - मालिका 1 - कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

आरबीआय/2016-17/290
आयडीएमडी.सीडीडी.क्र.2759/14.04.050/2016-17

एप्रिल 20, 2017

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून),
नेमलेली पोस्ट कार्यालये,
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआयएल),
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. आणि बाँबे स्टॉक एक्सचेंज लि.

महोदय/महोदया,

सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 - मालिका 1 - कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

कृपया, सार्वभौम सुवर्ण रोखे, 2017-18, मालिका 1 वरील भारत सरकारची जीओआय अधिसूचना एफ.क्र.4(8)-(डब्ल्यु अँड एम)/2017 व आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.2760/14.04.050/2016-17 दि. एप्रिल 20, 2017 चा संदर्भ घ्यावा. ह्याबाबतचे एफएक्यु आमच्या वेबसाईटवर (www.rbi.org.in) टाकण्यात आले असून त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे खाली दिली आहेत.

(1) अर्ज

ह्यासाठीचे अर्ज निवेशकांकडून, एप्रिल 24, 2017 ते एप्रिल 28, 2017 च्या दरम्यान, सामान्य बँक वेळात, शाखांमध्ये स्वीकारले जातील. अपूर्ण असलेले अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता असल्याने, स्वीकारर्कत्या कार्यालयांनी ते अर्ज सर्व बाबतीत पूर्ण असल्याची खात्री करुन घ्यावी. आवश्यक तेथे, अर्जदारांकडून अतिरिक्त माहिती मिळवावी. अधिक चांगल्या ग्राहक सेवेसाठी, निवेशकांना ऑनलाईन अर्ज करता येण्यासाठी, स्वीकारर्कत्या कार्यालयांनी व्यवस्था करावी.

(2) संयुक्त धोरण व नामनिर्देशन

अनेक संयुक्त धारक व नामनिर्देशक (प्रथम धारकाचे) ठेवण्यास परवानगी आहे. नेहमीच्या रीतीनुसार अर्जदारांकडून आवश्यक ती माहिती घेतली जावी.

(3) तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) आवश्यकता

तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) बाबतचे नॉर्म्स, प्रत्यक्ष स्वरुपात सोने खरेदी करण्याबाबत असल्याप्रमाणेच असतील. पासपोर्ट, पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड ह्यासारखे ओळख पटविणारे कागदपत्र आवश्यक आहेत. केवळ अल्पवयीन व्यक्तींसाठी, बँक खाते क्रमांकच केवायसी पडताळणीसाठी वैध समजला जावा. ही केवायसी प्रक्रिया, देणा-या बँका/एसएचसीआयएल कार्यालये/पोस्ट ऑफिसे/एजंट्स ह्यांच्याकडून केली जावी.

(4) अर्जाच्या पैशावरील व्याज

प्रदान प्रत्यक्ष मिळाल्याच्या तारखेपासून ते समायोजनाच्या तारखेपर्यंत (म्हणजे ते आऊट ऑफ फंड असलेल्या कालावधीसाठी) प्रचलित बँक दराचे व्याज दिले जाईल. अर्जदाराचे बँक खाते, स्वीकारर्कत्या बँकेत नसल्यास, त्या अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरने ते व्याज जमा केले जावे.

(5) रद्दीकरण

इश्यु बंद होण्याच्या तारखेपर्यंत (म्हणजे एप्रिल 28, 2017) अर्ज रद्द करण्यास परवानगी आहे. सुवर्ण रोखे खरेदी करण्यासाठी सादर केलेल्या विनंतीचे अंशतः रद्दीकरण करण्यास परवानगी नाही.

(6) लिएन मार्किंग

हे रोखे सरकारी प्रतिभूती असल्याने, त्याबाबतचे लिएन मार्किंग हे, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 च्या विद्यमान कायदेशीर तरतुदी व त्याखाली तयार केलेल्या नियमांनुसार असेल.

(7) एजन्सी व्यवस्था

अनुसूचित वाणिज्य बँका, त्यांच्या वतीने अर्ज गोळा करण्यासाठी, एनबीएफसी, एनएससी एजंट्स व इतरांची नेमणुक करु शकतात. अशा संस्थांबरोबर बँका व्यवस्था किंवा जोडणी करार करु शकतात. वितरणासाठीचे कमिशन, स्वीकारर्कत्या ऑफिसांना मिळालेल्या अर्जांवर प्राप्त झालेल्या एकूण वर्गणीच्या, रु. एक प्रति शंभर दराने दिले जाईल आणि स्वीकारर्कत्या कार्यालयांनी मिळालेले किमान 50% कमिशन, त्यांच्या एजंटांबरोबर किंवा सबएजंटांबरोबर, त्यांच्यामार्फत मिळालेल्या व्यवसायासाठी वाटून घ्यावे.

(8) आरबीआयच्या ई-कुबेर प्रणाली मार्फत प्रक्रिया

अधिसूचित वाणिज्य बँकांच्या शाखा व पोस्ट ऑफिसातून, आरबीआयच्या ई-कुबेर प्रणालीद्वारा वर्गणी देऊन सार्वभौम सुवर्ण रोखे उपलब्ध होऊ शकतात. ही ई-कुबेर प्रणाली इंफिनेट किंवा इंटरनेट द्वारे अॅक्सेस केली जाऊ शकते. स्वीकारर्कत्या ऑफिसांनी वर्गणीची एंट्री किंवा बल्क अपलोड करणे आवश्यक आहे. अनवधानाने होणा-या चुका टाळण्यासाठी, केलेली डेटा एंट्री बिनचुक असल्याची खात्री करुन घ्यावी. अर्ज मिळाल्यावर त्याचा ताबडतोब दुजोरा दिला जाईल. ह्याशिवाय, स्वीकारर्कत्या ऑफिसांना त्यांचा डेटाबेस अद्यावत करण्यास साह्य करण्यासाठी, फाईल अपलोडसाठी एक कन्फर्मेशन स्क्रोल त्यांना उपलब्ध केला जाईल. वाटप करण्याच्या तारखेस, म्हणजे मे 12, 2017 रोजी, एकल/प्रधान धारकाच्या नावे, सर्व धारकांसाठी धारण-प्रमाणपत्रे निर्माण केली जातील. स्वीकारकर्ती कार्यालये ती डाऊनलोड करुन प्रिंट आऊट्स घेऊ शकतात. ई-मेल अॅड्रेस दिला असलेल्या निवेशकांना, ही धारण प्रमाणपत्रे ई-मेलनेही पाठविता येऊ शकतात. डिपॉझिटरींच्या रेकॉर्डसमध्ये दिलेल्या अर्जांमधील तपशील जुळत असल्यास, वाटपाच्या 2-3 दिवसात, ह्या प्रतिभूती त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये जमा केल्या जातील.

(9) धारण-प्रमाणपत्रांची छपाई

ही धारण-प्रमाणपत्रे, ए 4 आकारात 100 जीएसएम रंगांमध्ये छापणे आवश्यक आहे.

(10) सेवा व पाठपुरावा

स्वीकारकर्ती कार्यालये (म्हणजे, अधिसूचित वाणिज्य बँकांच्या शाखा, नेमलेली पोस्ट ऑफिसे, एसएचसीआयएल आणि स्टॉक एक्सचेंजेस (एनएसई लि. व बीएसई) यांचे आपले ग्राहक असतील आणि रोख्यांबाबत आवश्यक त्या सेवा उपलब्ध करुन देतील (उदा. संपर्क तपशील अद्यावत करणे, मुदतपूर्व रोखीकरणाच्या विनंत्या स्वीकारणे इत्यादि) हे रोखे परिपक्व होऊन त्यांचे पुनर् प्रदान केले जाईपर्यंत, स्वीकारर्कत्या ऑफिसांनी हे रोखे जतन करुन ठेवणे आवश्यक आहे.

(11) व्यापार क्षमता

आरबीआयने अधिसूचित केलेल्या तारखेस व ते रोखे दिल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत हे रोखे ट्रेडिंग करण्यास पात्र असतील (येथे नोंद घेण्यात यावी की, केवळ डिपॉझिटरीजमध्ये डिमॅट स्वरुपात ठेवलेल्या रोख्यांचेच स्टॉक एक्सचेंजेसमध्ये ट्रेडिंग केले जाऊ शकते).

(12) संपर्क तपशील

कोणतेही प्रश्न/स्पष्टीकरणे पुढील जागी ई-मेलने पाठवावेत.

(अ) सार्वभौम सुवर्ण रोख्यांशी संबंधित : ई-मेल पाठविण्यासाठी येथे क्लिक करा.
(ब) आयटी संबंधित : ई-मेल पाठविण्यासाठी येथे क्लिक करा.

आपली विश्वासु,

(शायनी सुनील)
उप महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?