<font face="mangal" size="3">विशेष ठेव योजना (एसजीएस) - 1975 <br> कॅलेंडर वर्ष 2017 साठी ë - आरबीआय - Reserve Bank of India
विशेष ठेव योजना (एसजीएस) - 1975
कॅलेंडर वर्ष 2017 साठी व्याजाचे प्रदान
आरबीआय/2017-18/100 नोव्हेंबर 23, 2017 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/ महोदय, विशेष ठेव योजना (एसजीएस) - 1975 आम्ही येथे सांगू इच्छितो की, एसडीएस 1975 संबंधित राजपत्रित अधिसूचना भारत सरकारच्या वेबसाईटवर (egazette.nic.in) उपलब्ध असून त्यांचा मार्गदर्शनासाठी उपयोग केला जाऊ शकतो. कृपया खात्री केली जावी की, एसडीएस 1975 साठीचे, कॅलेंडर वर्ष 2017 साठीचे व्याज, राजपत्रात दिलेल्या दराने खातेधारकांना दिले जात आहे. (2) येथे सांगण्यात येते की, कॅलेंडर वर्ष 2017 साठीचे, व्याज एसडीएस खाते धारकांना, इलेक्ट्रॉनिक रीतीने किंवा अकाऊंट पेयी चेकने, जानेवारी 1, 2018 रोजीच दिले जावे. मात्र त्याबाबत, आमए परिपत्रक सीओ.डीटी.क्र.15.01.001/एच-3527/2003-04 दि. डिसेंबर 30, 2003 मध्ये दिलेल्या, सध्या लागु असलेल्या सूचना लागु असतील. (3) कृपया आपल्या सर्व ठेवी-कार्यालयांना सुयोग्य सूचना द्याव्यात. आपला विश्वासु, (हर्ष वर्धन) |