<font face="mangal" size="3">बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त खास ज्ञान किंवì - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त खास ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव
आरबीआय/2016-17/152 नोव्हेंबर 24, 2016 सर्व वाणिज्य बँका-आरआरबी सोडून. महोदय, बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त खास ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव बँकिंग व तंत्रज्ञान ह्यामधील नाविन्यपूर्ण शोधांची पार्श्वभूमी विचारात घेता, वाणिज्य बँकांच्या (आरआरबी सोडून) संचालक मंडळावरील संचालकांसाठीच्या निरनिराळ्या वैधानिक तरतुदीखाली दिलेले ह्या क्षेत्राविषयीचे ज्ञान व अनुभव, त्या बँकांना, त्यांचा वैविध्यपूर्ण व्यवसाय व जोखमींचे व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन करण्यासाठी, इतर क्षेत्रातील ज्ञान व अनुभव ह्यांच्याद्वारे वाढविण्याची आवश्यकता आहे. ह्यासाठी असे ठरविण्यात आले आहे की, बँकांमध्ये संचालक म्हणून नेमणुक केली जाण्यासाठी विचारात घ्यावयाच्या व्यक्तींबाबत, (1) माहिती तंत्रज्ञान (2) प्रदान व तडजोड प्रणाली (3) मानवी स्त्रोत (4) जोखीम व्यवस्थापन (5) व्यवसाय व्यवस्थापन ह्यांना समाविष्ट करुन विशेष ज्ञानाची (स्पेशलायझेशन) क्षेत्रे अधिक रुंद करण्यात यावीत. (2) संबंधित अधिसूचना डीबीआर.एपीपीटी.बीसी.क्र 38/29.39.001/2016-17 दि. नोव्हेंबर 24, 2016 ची एक प्रत सोबत जोडण्यात आली आहे. आपला विश्वासु, (अजय कुमार चौधरी) सोबत – अधिसूचना डीबीआर.एपीपीटी.बीसी.क्र.38/29.39.001/2016-17 नोव्हेंबर 24, 2016 बँकिंग कंपन्यांसाठी उपयुक्त विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव बँकिंग विनियम अधिनियम, 1949 चे कलम 10अ(2)(अ)(9); भारतीय स्टेट बँक अधिनियम, 1955 चे कलम 19 अ(1)(अ)(8); भारतीय स्टेट बँक (दुय्यम बँका) अधिनियम, 1959 चे कलम 25अ(1)(अ)(8) आणि बँकिंग कंपन्या (उपक्रमांची प्राप्ती व हस्तांतरण) अधिनियम 1970/1980 चे कलम 9(3अ)(अ)(8) ह्यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे अधिसूचित करत आहे की, (1) माहिती तंत्रज्ञान (2) प्रदान व तडजोड प्रणाली (3) मानवी स्त्रोत (4) जोखीम व्यवस्थापन आणि (5) व्यवसाय व्यवस्थापन ह्यांच्याशी संबंधित क्षेत्रामधील विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव, बँकिंग कंपनी, भारतीय स्टेट बँक, सहाय्यक/दुय्यम बँक आणि संगत नवीन बँक (असेल त्यानुसार) ह्यांना उपयुक्त असेल. (सुदर्शन सेन) |