<font face="mangal" size="3">इलेक्ट्रॉनिक प्रदानाला प्रोत्साहन देण्यास - आरबीआय - Reserve Bank of India
इलेक्ट्रॉनिक प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाय - वाढविलेला काल
आरबीआय/2016-17/203 डिसेंबर 30, 2016 सर्व प्रिपेड प्रदान संलेखदाते, सिस्टिम प्रोव्हायडर्स, महोदय/महोदया, इलेक्ट्रॉनिक प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाय - वाढविलेला काल परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1288/02.14.006/2016-17 दि. नोव्हेंबर 22, 2016 चा कृपया संदर्भ घेण्यात यावा. ह्यात किमान माहितीसह दिलेल्या सेमी-क्लोज्ड पीपीआयच्या मर्यादांमध्ये वाढ केल्याचे आणि पीपीआय वापरणा-या छोट्या व्यापा-यांसाठी विशेष वितरण करण्याबाबत सांगण्यात आले होते. हे उपाय, पुनरावलोकनाच्या अटीवर, डिसेंबर 30, 2016 पर्यंत लागु होते. (2) ही बँक, देशामधील प्रिपेड प्रदान संलेख (पीपीआय) देण्यासाठी, मार्गदर्शक तत्वे व साचा ह्यांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करत आहे. हे विचारात घेता (कृपया वृत्तपत्र निवेदन दि. सप्टेंबर 2, 2016 चा संदर्भ घ्यावा) असे ठरविण्यात आले आहे की, वरील परिपत्रकात विहित करण्यात आलेल्या उपायांना पीपीआय वरील मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन पूर्ण होईपर्यंत, मुदतवाढ दिली जावी. हे निदेश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित, कलम 10(2) खाली देण्यात आले आहेत. आपली विश्वासु, (निलिमा रामटेके) |